सोनाक्षीच्या घरी लग्नाची जय्यत तयारी; घरदार उजळले, मेहंदी फोटो व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : जहीर इकबाल आणि सोनाक्षी सिन्हा २३ जून रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाची जय्यत तयारी सुरु असून शत्रुघ्न सिन्हा यांचा जुहू येथील बंगला सजवण्यात आला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोनाक्षी-जहीर मुंबईत शिल्पा शेट्टीचे रेस्टॉरेंट बॅस्टियनमध्ये लग्नाचे रिसेप्शन देण्यासाठी तयार आहेत. अधिक वाचा – आयएएस अधिकाऱ्याने जमीन हडपल्याचा गायक …

सोनाक्षीच्या घरी लग्नाची जय्यत तयारी; घरदार उजळले, मेहंदी फोटो व्हायरल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जहीर इकबाल आणि सोनाक्षी सिन्हा २३ जून रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाची जय्यत तयारी सुरु असून शत्रुघ्न सिन्हा यांचा जुहू येथील बंगला सजवण्यात आला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोनाक्षी-जहीर मुंबईत शिल्पा शेट्टीचे रेस्टॉरेंट बॅस्टियनमध्ये लग्नाचे रिसेप्शन देण्यासाठी तयार आहेत.
अधिक वाचा –

आयएएस अधिकाऱ्याने जमीन हडपल्याचा गायक लकी अलीचा आरोप

शत्रुघ्न सिन्हांचा बंगला सजावटी स्ट्रिंग लाईट्सने उजळला आहे. दरम्यान, सोनाक्षीच्या मेहंदी सेरेमनीचा एक फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये शुक्रवारी मुंबईत मेहंदी सेरेमनीमध्ये ती जहीर इकबालसोबत पोज देताना दिसली. होणारी वधू सोनाक्षी खूप सुंदर होती. फोटोमध्ये दोन्ही परिवार आणि मित्रमंडळी एकत्र पोज देताना दिसतात.

अधिक वाचा –

‘कल्कि 2898 एडी’ दुसरा ट्रेलर; दीपिकाची लक्षवेधी भूमिका (Video)

काय म्हणाले होते शत्रुघ्न सिन्हा?
शत्रुघ्न म्हणाले, ‘मी निश्चितपणे लग्नाला उपस्थित राहिन. तिचा आनंद हा माझा आनंद आहे. आणि मी देखील या आनंदाचा हकदार आहे. तिला आपल्या लग्नाबद्दल निवड करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी न केवळ तिची ताकदचं नाही तर संरक्षक म्हणून देखील इथे आहे.’
अधिक वाचा –

अनुपम खेर यांच्या ऑफिस चोरी प्रकरणी २ सराईट चोरट्यांना अटक 

सोनाक्षी सिन्हा देखील लग्नाच्या चर्चेदरम्यान पहिल्यांदा स्पॉट झाली. ती आपल्या कारमधून उतरली आणि अपार्टमेंटच्या इमारतीत गेली. ती बाहेर उभे असलेल्या पॅपराझींशी एक शब्ददेखील बोलली नाही. यावेळी ती टाळाटाळ करताना दिसली. यावेळी ती पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसली. तिने मास्कने आपला चेहरा झाकला होता.

 

View this post on Instagram

 
A post shared by Zaheer Iqbal (@iamzahero)