बीड: केज-कळंब रोडवर रिक्षा पलटी; तिघे जखमी

बीड: केज-कळंब रोडवर रिक्षा पलटी; तिघे जखमी

केज: Bharat Live News Media वृत्तसेवा :  केज-कळंब रोडवर रिक्षा पलटी होवून तिघे जखमी झाले. ही घटना आज (दि. २२) दुपारी १२ च्या सुमारास केज-कळंब रोडवर घडली. केज कडून साळेगावकडे जात असलेल्या रिक्षाला टिपू सुलतान चौकाजवळ एका मटनाच्या दुकानासमोर भटके कुत्रे आडवे आल्याने रिक्षा पलटी झाली.
या अपघात रिक्षात बसलेला ओंकार गणेश महाजन  (वय १७, रा. साळेगाव), रेश्मा शेख (वय ५०, रा. केज) व रिक्षा चालक अजय रतन बचुटे (वय ३३, रा. साळेगाव) हे तिघे जण जखमी झाले.
जखमी पैकी ओंकार महाजन यांच्या उजव्या मांडीचे हाड मोडले असून डाव्या पायाला जखम झाली आहे. तसेच रेश्मा शेख यांच्या डोक्याला व छातीला मुका मार लागला आहे. तर अजय बचुटे यांच्या डोक्याला व चेहऱ्यावर खरचटले आहे. अपघातातील जखमींवर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले. ओंकार महाजन आणि रेश्मा शेख यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात हलविले आहे. रिक्षा चालक अजय बचुटे हा किरकोळ जखमी असल्याने त्याला प्रथमोपचार करून घरी पाठविले आहे.
हेही वाचा 

बीड : राष्ट्रीय महामार्गावरील एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी पळवले
बीड: केज येथे ‘ज्ञानराधा’च्या सुरेश कुटेसह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बीड – २४ तासानंतर तलावात सापडला बुडालेल्या युवकाचा मृतदेह