मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा: ज्येष्ठ अभ्यासक यास्मिन शेख यांची मागणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भाषेला जात नसते. मराठी माझी मातृभाषा आहे. माझ्या मातृभाषेवर माझे नितांत प्रेम आहे. गेली अनेक वर्षे मी तिची मनापासून सेवा करतो. यापुढेही करत राहीन. भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे आणि समृद्ध करणे प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा, अशा भावना व्याकरणतज्ज्ञ आणि …

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा: ज्येष्ठ अभ्यासक यास्मिन शेख यांची मागणी

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : भाषेला जात नसते. मराठी माझी मातृभाषा आहे. माझ्या मातृभाषेवर माझे नितांत प्रेम आहे. गेली अनेक वर्षे मी तिची मनापासून सेवा करतो. यापुढेही करत राहीन. भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे आणि समृद्ध करणे प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा, अशा भावना व्याकरणतज्ज्ञ आणि भाषा विज्ञानाच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रा. यास्मिन शेख यांनी व्यक्त केल्या.
प्रा. यास्मिन शेख यांनी शुक्रवारी शंभराव्या वर्षांत पदार्पण केले. त्यानिमित्त त्यांचे आप्तेष्ट, मित्रपरिवार, व्याकरण क्षेत्रातील अभ्यासक यांनी त्यांचा गौरव समारंभ आयोजित केला होता. या वेळी ‘यास्मिन शेख : मूर्तिमंत मराठीप्रेम’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखक आणि संपादक भानू काळे, यास्मिन शेख, लेखकर दिलीप फलटणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
पुण्याचे प्रधान आयकर आयुक्त संग्राम गायकवाड, एलआयसीचे ज्येष्ठ अधिकारी शशी पाटील, अमोल जगताप, आनंद कटके, माधवी वैद्य, पुण्याचे माजी उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, शैलजा मोळक, ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ, ज्येष्ठ पत्रकार विनय हर्डीकर, रविप्रकाश कुलकर्णी आदी उपस्थित होते. यास्मिन शेख यांच्या कन्या रुमा बावकर यांनी सूत्रसंचालन केले. कविता गायनाचा कार्यक्रम झाल्यावर प्रा. यास्मिन शेख यांचे औक्षण करण्यात आले. डॉ. शमा भागवत यांनी स्वागत केले.

हेही वाचा

Pune Traffic | वारजे चौकात वाहतुकीचा बट्ट्याबोळ!
अनुपम खेर यांच्या ऑफिस चोरी प्रकरणी २ सराईट चोरट्यांना अटक
फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रिकरण प्रक्रियेला वेग