…जरा सांभाळून

पावसाळा सुरू झाला आहे. आता महाराष्ट्रभर धो धो पावसाला सुरुवात होईल. ताई, दादा सांभाळून राहा. शेतकरी बंधूंनो, सांभाळून राहा. पाऊस पडण्यापूर्वी विजा कडाडतात. अशावेळी शेतात काम करणार्‍या शेतकर्‍यांच्या अंगावर वीज पडली, तर क्षणार्धात त्याचा कोळसा होतो. शेतकरी दादा, काम केल्याशिवाय तर होणार नाही हे आम्हालाही माहिती आहे; पण विजा कडाडत असताना सुरक्षित ठिकाणी जाऊन उभा …

…जरा सांभाळून

पावसाळा सुरू झाला आहे. आता महाराष्ट्रभर धो धो पावसाला सुरुवात होईल. ताई, दादा सांभाळून राहा. शेतकरी बंधूंनो, सांभाळून राहा. पाऊस पडण्यापूर्वी विजा कडाडतात. अशावेळी शेतात काम करणार्‍या शेतकर्‍यांच्या अंगावर वीज पडली, तर क्षणार्धात त्याचा कोळसा होतो. शेतकरी दादा, काम केल्याशिवाय तर होणार नाही हे आम्हालाही माहिती आहे; पण विजा कडाडत असताना सुरक्षित ठिकाणी जाऊन उभा राहा भाऊ. सौदामिनीचा कल्लोळ अंगावर घेऊन जीव गमावू नकोस, प्लीज!
ताई, दादा, धो धो पाऊस पडतो आहे ना, मग घराबाहेर पडायची काय गरज आहे? बसा ना शांत चित्ताने घरीच. पाऊस पडला की, तुम्हाला जोर येतो पिकनिक स्पॉटला जाण्याचा. पर्वतरांगांमधून कोसळणार्‍या धबधब्याचे पाणी अंगावर घेण्याचा मोह प्रत्येकाला होतच असतो. जरुर पाण्याच्या, पावसाच्या वर्षावात चिंब भिजून जा; पण रील काढण्याच्या नादामध्ये पाय घसरू देऊ नका, ही नम— विनंती आहे.
रील काढण्यासाठी जे नवनवीन प्रताप केले जात आहेत ते पाहून, तर आजकाल काळजीच वाटायला लागलेली आहे. डोंगराच्या कड्याच्या टोकावर जाऊन खूप चांगले रील निघत असले, तरी जीवावरचा धोका पत्करण्याची खरच गरज आहे का, याचा पण विचार करा. ताई तू खूप छान दिसतेस, छान रील काढतेस; पण तुझा जीवही तितकाच महत्त्वाचा आहे, हे पण लक्षात घे! लेकरू कोणाचेही अपघातामध्ये जावो, आमच्यासारख्या प्रत्येकाचा जीव तळमळत असतो. त्या आई-वडिलांवर काय परिस्थिती येत असेल, याचा विचार मनात आला, तरी आम्ही हादरून जातो. म्हणूनच म्हणतो दादा, जिथे जाशील तिथे जरुर जा; पण सांभाळून. पावसात बाहेर पडून भिजावेसे वाटले, तर फार कौतुक म्हणून भात लावणीचे काम करतानाचे रिल्स काढा; पण डोंगरकड्यावर जाऊन चित्रविचित्र हातवारे करत रील काढू नका, प्लीज!
समजा चार-आठ दिवस आपण सोशल मीडियावर एखादी रील टाकली नाही, तर फारसे काही बिघडत नाही. घरातील लोकही काळजीपोटी इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको असे सांगत असतात; परंतु ताई आणि दादा, तुम्ही घरातील लोकांनाही न सांगता नको ते करायला जाता आणि जीव गमावून बसता. नका रे प्लीज असे करू. आपण आपल्या आई-वडिलांची उमेद असतो. आपल्याकडे पाहतच ते आयुष्य जगत असतात. त्यांच्या आयुष्यात अंधकार होणार नाही, याची काळजी आपणच घेतली पाहिजे. धोकादायक जागी रील काढत बसण्यापेक्षा घराच्या अंगणात पण पाऊस पडतोच ना? आपल्या परिसरातील झाडे, गवत चिंब भिजत असतेच ना? मग, डोंगरदर्‍यांमध्ये जाऊनच शूटिंग घेण्यामध्ये कसला आलाय शहाणपणा?
पाऊस पडत असताना भणाण वारे वाहत असते आणि ते वारे कुणाला कोणत्या दिशेने ढकलून देईल ते सांगता येत नाही. आपण सावध असले पाहिजे. बघा सांगायचे आमचे काम आहे. तुमचे आई-वडीलही सांगत असतील, तर एक क्षण थांबून विचार करा आणि नको ते साहस करू नका, प्लिज!
एक जूनपासून समुद्रावरील मासेमारी शासनाने बंद केली आहे. पावसाळा हा काळ माशांचा ब—ीडिंग सीझन असतो. अशावेळी मासेमारी करणे म्हणजे पुढील काळातील माशांचे उत्पादन कमी करणे होय. समुद्र केव्हा खवळेल तेही सांगता येत नसते. पैशाच्या मोहात जीवावर उदार होऊन काही कोळी बांधव समुद्रात बोटी नेतात, जे की धोकादायक आहे.