कोल्हापूर : कुस्तीपटू गौरी पुजारी हिचे निधन

कोल्हापूर : कुस्तीपटू गौरी पुजारी हिचे निधन

कुरुंदवाड; Bharat Live News Media वृत्तसेवा : तेरवाड (ता. शिरोळ) येथील राष्ट्रीय कुस्तीपटू गौरी ऊर्फ विनया सुभाष पुजारी (वय 24) हिचे निधन झाले.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गौरीने कुस्ती क्षेत्रात नावलौकीक कमावला होता. तिचे प्राथमिक शिक्षण तेरवाड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत, तर माध्यमिक शिक्षण कुरुंदवाड येथे झाले होते.
कुस्तीचे बाळकडू तिला चुलते नंदू व सुनील पुजारी यांच्याकडून मिळाले. तिने ऑल इंडिया चॅम्पियनशिप, म्हैसूर केसरी, महाराष्ट्र चॅम्पियनशिप, बहुचर्चित आमीर खान यांच्या दंगल चित्रपटांमध्ये कुस्तीपटू म्हणून विशेष सहभाग घेतला होता. ती सध्या महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद याठिकाणी सराव करत होती. तिची नॅशनल इन्स्टिट्यूट स्पोर्टस् पंजाब येथील पटियालामध्ये कुस्ती प्रशिक्षक म्हणून निवड झाली होती. तिच्या मागे आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे.