पुणे; Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणतांबा कानेगाव आणि दौंड मनमाड विभागात सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे पुणे-मुंबई-पुणे दरम्यान धावणारी इंटरसिटी एक्सप्रेस आणि डेक्कन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. या एक्सप्रेस गाड्या २८ जून ते ३० जूनपर्यंत रद्द करण्यात येणार आहेत.
‘या’ गाड्या होणार रद्द
शुक्रवार २८ जूनला पुणे-मुंबई इंटरसिटी/एक्सप्रेस रद्द राहणार आहे. शनिवारी २९ जूनला मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस रद्द करण्यात येणार आहे. तर त्याच दिवशी पुणे मुंबई इंटरसिटी सुद्धा रद्द राहणार आहे. तसेच, रविवारी ३० जून रोजी मुंबई-पुणे इंटरसिटी रद्द राहणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना या तीन दिवशी पुणे मुंबई प्रवासासाठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.
हेही वाचा :
Hajj Yatra 2024 : हज यात्रेदरम्यान 98 भारतीयांचा मृत्यू
माेठी बातमी : उच्च न्यायालयाची केजरीवालांच्या जामीनाला स्थगिती
चंद्रपुरात केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन