कोल्हापूर : पेठवडगाव येथील अपघातात सावर्डेच्या तरुणाचा मृत्यु

कोल्हापूर : पेठवडगाव येथील अपघातात सावर्डेच्या तरुणाचा मृत्यु

किणी, Bharat Live News Media वृत्तसेवा : पेठ वडगाव येथे टेम्पो व दुचाकी यांच्यामध्ये शुक्रवारी (दि.21) अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडला. अनिल उर्फ बाळु दिनकर पाटील (वय 38, रा.सावर्डे ता.हातकणंगले) असे अपघातातील मृताचे नाव आहे.
सावर्डे येथील अनिल पाटील हे कामानिमित्त पेठ वडगाव येथे गेले होते. वडगाव मधील आपले काम आटोपून सावर्डेकडे निघाले. या दरम्यान साई हॉटेल समोर गव्हाची पोती भरून हातकणंगले कडे जाणाऱ्या टेम्पो (एमएच.11 एएल 3854) च्या चालकाने एसटी बस आडवी येत असल्याने वाहनमध्येच थांबवले.
यामुळे पाठीमागून आलेल्या दुचाकीची (एमएच 09 सीसी 2328) धडक टेम्पोला बसली. या धडकेने दुचाकीवरील अनिल पाटील गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना वडगाव येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात नेत असताना उपचारपूर्वीच त्यांचा मृत्यु झाला. या अपघाताची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
हेही वाचा :

चंद्रपुरात जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; तिघांना अटक
मराठ्यांना डुबवलं तर तुम्हालाही डुबवणार : मनोज जरांगे
नाशिक: ‘नाना’ आतुरतेने गाडीजवळ आले पण व्यर्थच… भेट नेमकी कशासाठी; ‘राज’ गुलदस्त्यात