सांगली : शिराळ्यात कारच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार

शिराळा, पुढारी वृत्तसेवा : शिराळातील बाह्य वळण रस्त्यावरील गोरक्षनाथ मंदिराजवळ कारने दिलेल्या धडकेत मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.२१) दुपारी दोनच्या सुमारास घडली. संतोष उत्तम ताईंगडे ( वय ३५, रा.तळमाऊली, जि. सातारा) असे मृत तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, संतोष ताईंगडे हे मांगले येथील मित्राला भेटण्यासाठी मोटारसायकल ( क्र.एम एच ११ …

सांगली : शिराळ्यात कारच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार

शिराळा, Bharat Live News Media वृत्तसेवा : शिराळातील बाह्य वळण रस्त्यावरील गोरक्षनाथ मंदिराजवळ कारने दिलेल्या धडकेत मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.२१) दुपारी दोनच्या सुमारास घडली. संतोष उत्तम ताईंगडे ( वय ३५, रा.तळमाऊली, जि. सातारा) असे मृत तरूणाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, संतोष ताईंगडे हे मांगले येथील मित्राला भेटण्यासाठी मोटारसायकल ( क्र.एम एच ११ ए एस १९५८) वरून निघाले होते. यावेळी कार ( क्र. एम एच ११ ए के २६४८) करण हरिभाऊ सोमोशे ( वय २५ , रा.पलूस ) हे कोकरूड कडून पलूस कडे निघाले होते. यावेळी मोटरसायकल व कारची समोरासमोर धडक होऊन संतोष ताईंगडे यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत फिर्याद विजय खांबे दिली असून पुढील तपास शिराळा पोलीस करीत आहेत.