काश्मीरमध्ये लवकरच उभारणार महाराष्ट्र भवन : मंत्री रविंद्र चव्हाण

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाच्या वतीने काश्मीरमध्ये आता लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. या बरोबरच काश्मीरमध्ये जमीन खरेदीसाठी विभागाच्या वतीने 9 कोटी 30 लाख 24 हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. या संदर्भात मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, जम्मू …

काश्मीरमध्ये लवकरच उभारणार महाराष्ट्र भवन : मंत्री रविंद्र चव्हाण

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाच्या वतीने काश्मीरमध्ये आता लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. या बरोबरच काश्मीरमध्ये जमीन खरेदीसाठी विभागाच्या वतीने 9 कोटी 30 लाख 24 हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.
या संदर्भात मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीर सरकारने बडगाम जिल्हयातील 2.50 एकर जमीन महाराष्ट्र सरकारला तेथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी प्रदान केलेली आहे. जमीन खरेदीची प्रक्रिया दोन्ही राज्यांकडून पुर्ण झाली आहे. महाराष्ट्र सदन उभारण्याच्या दृष्टीने दोन्ही राज्यात आवश्यक प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आता या भूखंडावरील जागेवर उभे राहणारे महाराष्ट्र सदन कोणत्या स्वरुपाचे असावे, त्यामध्ये कोणत्या सोयी-सुविधा असतील याचे नियोजन आणि आराखड्याची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष महाराष्ट्र सदन उभारणीच्या कामाला सुरुवात होईल. त्यामुळे लवकरच कश्मिरमध्ये महाराष्ट्र सदन उभे राहिल असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :

Maharashtra Budget 2024 | जम्मू काश्मीर आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्येत महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय
Maharashtra Budget Session 2024 : अयोध्येमध्ये ‘महाराष्ट्र भवन’ उभारणार; अजित पवारांची घोषणा
श्रीनगरला महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्या