बीड: केज येथे ‘ज्ञानराधा’च्या सुरेश कुटेसह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बीड: केज येथे ‘ज्ञानराधा’च्या सुरेश कुटेसह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

केज: Bharat Live News Media वृत्तसेवा: केज येथे बहुचर्चित ज्ञानराधाचे मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीचे सुरेश कुटे, त्यांचे संचालक आणि केज शाखेचे व्यवस्थापक यांच्या विरुद्ध फसवणूक आणि इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत केज येथील सीमा सुरक्षा दलातील निवृत्त कर्मचारी उत्तरेश्वर पांडुरंग डोईफोडे यांनी तक्रार केली आहे.
ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी जास्त व्याजदर देण्याच्या आमिषाने गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे उत्तरेश्र्वर डोईफोडे यांनी पत्नी, मुलगा, मुलगी व नातेवाईकांच्या नावांवर सुमारे ७० लाख ८३ हजार २८६ मुदत ठेव म्हणून जमा केली होती. त्या ठेवींची मुदत संपल्या नंतरही पैसे न देता त्यांची फसवणूक केली.
याप्रकरणी केज (ता. केज, जि. बीड) शाखेचे प्रमुख सुरेश ज्ञानोबा कुटे, संचालक वसंत शंकरराव सताळे, यशवंत वसंतराव कुलकर्णी, आशिष प‌द्माकर पाटोदेकर, दादाराव हरिदास उंदरे, वैभव यशवंत कुलकर्णी, कैलास काशिनाथ मोहिते, शिवाजी रामभाउ परसकर, रविंद्र मधुकर ताळबे, आशा प‌द्माकर पाटील, रेखा वसंतराव सताळे, रघुनाथ सखाराम खरसाडे, रविंद्र श्रीरंग यादव व केज शाखेचे शाखा व्यवस्थापक सचिन नारायण कापले आदी १४ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरक्षक राजेश पाटील हे तपास करीत आहेत.
हेही वाचा 

बीड – २४ तासानंतर तलावात सापडला बुडालेल्या युवकाचा मृतदेह
बीड: केज येथे लग्नाच्या आमिषाने विवाहित परिचारिकेवर अत्याचार
बीड : भोपला तलावात पोहायाला गेलेला युवक बुडाला; शोधकार्य सुरु