खासदार रविंद्र वायकर, निवडणूक आयोगाविरोधात हायकोर्टात याचिका

खासदार रविंद्र वायकर, निवडणूक आयोगाविरोधात हायकोर्टात याचिका

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील रविंद्र वायकर यांच्या संशयास्पद पद्धतीने निवडणूक जिंकण्याचे प्रकरण आता उच्च न्यायालयात पोहोचले आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढविणारे भरत खिमजी शहा यांनी मुंबई उच्च न्यायालयात आज (दि. २१) याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी निकालावर स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे. ॲड. असीम सरोदे, ॲड. विनय खातु, ॲड. श्रीया आवले, ॲड. बाळकृष्ण निढाळकर, ॲड. किशोर वरक यांची मदतीने ही याचिका दाखल केली आहे.
या याचिकेत केंद्रीय निवडणूक आयोग, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी, रविंद्र वायकर तसेच महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाला मोकळ्या आणि पारदर्शक वातावरणात निवडणुकीचे व मतमोजणीचे काम करण्यात अपयश आले आहे. ४ जून २०२४ रोजी या मतदारसंघातील मतमोजणी नेस्को मतदान केंद्रावर झाली. सातत्याने विजयाचे दिशेने अग्रक्रमावर असलेले अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित करण्यात आल्या नंतर पोस्टल बॅलेटची पुनर्मोजणी करण्याची मागणी रविंद्र वायकर यांच्या तर्फे करण्यात आली. आणि विविध घडामोडींचा शेवट अचानक रविंद्र वायकर ४८ मतांने विजयी होण्यात झाला.
निवडणूक अधिकारी कार्यालयात तात्पुरत्या सेवेत असलेल्या दिनेश गुरव या व्यक्तीचा मोबाईल फोन प्राजक्ता वायकर- महाले आणि नंतर मंगेश पांडिलकर यांनी मतमोजणीच्या वेळी व मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी वापरण्यावर मुख्यतः आक्षेप घेतलेला आहे. निवडणूक अधिकारी कार्यालयात दिनेश गुरव या व्यक्तीची तात्पुरती झालेली नेमणूक योग्य आहे का ?, अश्या प्रकारे खाजगी कंपनीतील एखाद्या व्यक्तीची तात्पुरती नेमणूक होऊ शकते का ?, निवडणूक आयोगा सोबत कार्यरत कोणतीही व्यक्ति मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल फोन घेऊन जाऊ शकतात का ? असे प्रश्न उपस्थित करून निवडणूक रिटरनिंग अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्यापासून केवळ २ फुटांच्या अंतरावर प्राजक्ता वायकर- महाले मोबाईल वापरताना त्यांनी आक्षेप का घेतला नाही, असे प्रश्न उपास्थित करण्यात आले आहेत.
हेही वाचा 

मुंबई : बर्फीवाला उड्डाणपूल गोखले पुलाला जोडण्यात यश!
ठाकरे सेनेचे आमदार रवींद्र वायकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल
रविंद्र वायकर यांच्या पंचतारांकित हॉटेलवर कारवाई होणार; किरीट सोमय्यांचा दावा