जालना: ओबीसी आंदोलन चिघळले; शिवाजीनगरजवळ बस फोडली
शहागड, Bharat Live News Media वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील शिवाजीनगरजवळ छत्रपती संभाजीनगर – बीड (एमएच 20 बी.एल.1116) ही एसटी बस ओबीसी आंदोलकांनी आज (दि.२१) फोडली. यामुळे वाहक आणि चालकासह प्रवाशांची तारांबळ उडाली.
यावेळी ४ ते ५ आंदोलकांनी पिवळा झेंडा हातात घेऊन घोषणाबाजी केली. आणि बसवर दगडफेक केली. चालकाला धमकी देत तुम्ही खाली उतरा, व्हिडिओ शुटिंग काढू नका, असे त्यांनी धमकावले आणि दुचाकीवरून पसार झाले.
या घटनेची माहिती गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांना मिळताच उपनिरीक्षक गणेश जांगडे, किरण हावाले, जमादार गणेश मुंडे यांच्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून पाठवले. दगडफेक केलेली बस बंद पडल्याने शीघ्र कृती दलाच्या जावनांनी बसला धक्का देत चालू केली. ही बस डेपोमध्ये पाठवली. या बसमध्ये महिला वाहक होती.
हेही वाचा
जालना : दोन बांधकाम मजुरांचा ट्रॅक्टर खाली पडून मृत्यू
जालना : ओबीसी आंदोलनाची दखल न घेतल्याने धुळे-सोलापूर महामार्गावर रस्ता रोको
जालना: ओबीसी उपोषणकर्त्यांचे शिष्टमंडळ मुंबईला गेलेचं नाही