परभणी: आहेरवाडी येथे दिपीकाच्या कुटुंबियाचे फौजिया खान यांच्याकडून सांत्वन

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी पालकांकडे पैसे नसल्याने विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा केली होती. त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी. मी राज्य सरकार आणि संसदेत मुलींच्या मोफत शिक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आवाज उठवणार आहे. त्यासाठी संघर्ष करण्यास तयार आहे, अशी ग्वाही खासदार फौजिया खान यांनी आज (दि.२१) येथे दिली. पूर्णा …

परभणी: आहेरवाडी येथे दिपीकाच्या कुटुंबियाचे फौजिया खान यांच्याकडून सांत्वन

पूर्णा, Bharat Live News Media वृत्तसेवा: नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी पालकांकडे पैसे नसल्याने विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा केली होती. त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी. मी राज्य सरकार आणि संसदेत मुलींच्या मोफत शिक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आवाज उठवणार आहे. त्यासाठी संघर्ष करण्यास तयार आहे, अशी ग्वाही खासदार फौजिया खान यांनी आज (दि.२१) येथे दिली.
पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील नीट परीक्षेची तयारी करणा-या दिपीका दौलत खंदारे हिने तीन दिवसांपूर्वी घरच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून जीवन संपविले होते. या मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन खासदार फौजिया खान यांनी सांत्वन केले. या प्रसंगी त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, दिपीकाच्या मृत्यूमुळे अतिशय वेदना झाल्या आहेत. तिच्या आईचे हाल बघून अतिशय वाईट वाटले. आईकडे पैसे नसल्यामुळे कोचिंग क्लास कसा लावायचा. पुढच्या शिक्षणाचे कसे होईल, नीटची तयारी कशी करु, पेपरही फुटत आहेत, अशा परिस्थितीत आपला काही नंबर लागणार नाही, या विवंचनेतून दिपीकाने टोकाचे पाऊल उचलले ही गंभीर बाब आहे.
यावेळी खा. फौजिया खान‌ यांनी दिपीकाची विधवा आई मीराबाई, डी. फार्मसीचे शिक्षण पूर्ण केलेली बहीण जना. दहावीतील भाऊ गजानन यांना धीर दिला. तसेच दिपीकाची बहीण व भावाच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. या प्रसंगी महेश‌ पाटील, सुभाष खंदारे, प्रा राजेश‌ खंदारे, रितेश काळे, बापूराव घाटोळ यासह गावकरी उपस्थित होते.
हेही वाचा 

परभणी -ताडकळस ते महातपुरी शिवरस्ता खुला करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर दगडफेक
परभणी हळहळली : शिक्षणाचा खर्च झेपत नाही म्हणून गुणवंत विद्यार्थिनीने संपवले
परभणी: मानवत येथे हायवाला धडकून दुचाकीस्वार ठार