भंडारा : महायुती सरकारविरोधात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी (दि.21) महायुती सरकारच्या विरोधात चिखलफेक आंदोलन करण्यात आले. राज्यातील आणि केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, तरूण, गरिब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले आहे. मागील 10 वर्षापासून भाजप सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खिळ घातली आहे. सरकारी …

भंडारा : महायुती सरकारविरोधात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन

भंडारा, Bharat Live News Media वृत्तसेवा : भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी (दि.21) महायुती सरकारच्या विरोधात चिखलफेक आंदोलन करण्यात आले. राज्यातील आणि केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, तरूण, गरिब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले आहे.
मागील 10 वर्षापासून भाजप सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खिळ घातली आहे. सरकारी नोकर भरती केली जात नाही. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत. परीक्षा घेतल्या तर पेपरफुटीचे ग्रहण लागते. शेतकरी संकटात आहे पण त्यांना मदत दिली जात नाही. धान्य, कांदा, यासह कोणत्याही शेतमालाला भाव मिळत नाही. सरकार एमएमपी देत नाही. कठीण काळात जनतेला मदत करण्याऐवजी सरकार जनतेचे शोषण आणि आर्थिक पिळवणूक करत आहे, असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
या चिखलफेक आंदोलनात भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, खासदार डॉ. प्रशांत पडोळे, सफी लड्डानी, सुभाष आजबले, माजी आमदार अनिल बावनकर, जि.प. अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, सभापती मदन रामटेके, सभापती स्वाती वाघाये, सागर गणवीर, महिला काँग्रेस अध्यक्ष जयश्री बोरकर, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन वंजारी, तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, राजेश हटवार, उत्तम भागडकर, गजानन झंझाड आदी उपस्थित होते.
हेही वाचा :

बुलढाणा : सिंदखेडराजा येथे उत्खननात आढळली विष्णूची दुर्मिळ मूर्ती
नाशिक : पवार शिष्योत्तमद्वयींची चलबिचल घरवापसीचे निदर्शक?
नाशिक: ‘नाना’ आतुरतेने गाडीजवळ आले पण व्यर्थच… भेट नेमकी कशासाठी; ‘राज’ गुलदस्त्यात