खडसेंनी घेतली गृहमंत्री शहा यांची भेट; भाजपामध्ये लवकरच प्रवेश?
जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – एकनाथ खडसे हे भाजपामध्ये येणार या चर्चेला आता पुष्टी मिळाली असून ते केव्हा भाजपात प्रवेश घेणार याबद्दलची माहिती निश्चित नसली तरी याबाबतची राजकीय चर्चा जोरदार रंगलेली आहे. नुकतीच गुरुवार (दि.२०) रोजी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व सासरे एकनाथ खडसे यांनी गृहराज्यमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीबद्दल राजकीय वतुर्ळात अनेक उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
एकनाथ खडसे भाजपात येणार यावरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगलेली आहे. त्यात नुकत्याच पालकमंत्री गुलाबराव पाटील व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे व नामदार गिरीश महाजन यांनी एकत्र यावे आणि जिल्ह्याचा विकास करावा असे स्टेटमेंट दिल्यानंतर या चर्चेला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे.
गुरुवार (दि.२० रोजी एकनाथ खडसे यांनी व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतली आहे. भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असताना एकनाथ खडसे यांनी आता अमित शहा यांची भेट घेतली आहे. यावेळी नेमकी काय चर्चा झाली. खडसे यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग अखेर मोकळा झालाय का ? हे पाहणं देखील महत्त्वाचे आहे
याबाबत एकनाथराव खडसे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, केंद्रीय राज्यमंत्री रक्षI खडसे यांना भाजपाने मंत्री पद दिल्याबद्दल अमित शहा यांची भेट घेतल्याचा त्यांनी खुलासा केला. त्यामुळे खडसे यांच्या भाजपात लवकरच प्रवेश होणार या चर्चेलात तुर्तास तरी पूर्णविराम मिळालेला आहे.
हेही वाचा:
एकनाथ खडसेंनी घेतली अमित शहांची भेट, भाजपमध्ये प्रवेश करणार?
Jalgaon News | खडसे, महाजन यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न – रक्षा खडसे