मराठ्यांना डुबवलं तर तुम्हालाही डुबवणार : मनोज जरांगे
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ओबीसी नेत्यांच्या दबावाला बळी पडून मराठ्यांवर अन्याय करू नका, मराठ्यांना डुबवलं तर तुम्हालाही डुबवणार, असा गर्भित इशारा देत १३ जुलैपर्यंत वाट बघणार, मग पुढची भूमिका ठरवणार आहे, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज (दि.२१) स्पष्ट केले. ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.
ओबीसी नेत्यांकडून शिकावं की, जातीयवाद कसा असतो, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. कुणबी नोंदी रद्द करणार नाही, असे सरकारने सांगावे, ओबीसी नेते आपला फायदा घेऊ लागले आहेत. जातीय तेढ नको म्हणून आम्ही शांत भूमिका घेतली आहे. मी जातीयवाद करणार नाही आणि मराठा नेत्यांना आम्ही त्रासही देणार नाही, असे ते म्हणाले.
हेही वाचा
जालना : मनोज जरांगे यांचे आंदोलन अंतरवालीतच हाेणार, ग्रामसभेकडून शिक्कामोर्तब
..तर विधानसभेच्या सर्व जागा लढविणार : मनोज जरांगे पाटलांचा निर्धार
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे उपोषणावर ठाम, अंतरवाली सराटीत पोलिसांचा बंदोबस्त