रत्नागिरी: साखरपा, जाधववाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी

देवरुख; पुढारी वृत्तसेवा: संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी येथे भर वस्तीत शुक्रवारी (दि.२१) सकाळी घरगुती काम करणारा अमित जाधव या तरुणावर बिबट्याने हल्ला केला. यात हा तरुण गंभीर जखमी झाला. हाताला व डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी महिलेवर देखील हल्ला झाला होता. या सलग घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अमित नेहमीप्रमाणे आपल्या नवीन …

रत्नागिरी: साखरपा, जाधववाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी

देवरुख; Bharat Live News Media वृत्तसेवा: संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी येथे भर वस्तीत शुक्रवारी (दि.२१) सकाळी घरगुती काम करणारा अमित जाधव या तरुणावर बिबट्याने हल्ला केला. यात हा तरुण गंभीर जखमी झाला. हाताला व डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी महिलेवर देखील हल्ला झाला होता. या सलग घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अमित नेहमीप्रमाणे आपल्या नवीन घराच्या बांधकामावावर पाणी घालण्यासाठी गेला होता. त्यावेळी आतमध्ये आडोशाला बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. यावेळी त्याच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याला दवाखान्यात आणले. गुरववाडी याठिकाणी गुरुवारी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. भरदिवसा झालेल्या हल्ल्याने ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी संतप्त नागरिकांतून होत आहे.
दोन दिवसांपूर्वी साखरपा, जाधववाडी येथे एक महिला बिबट्याच्या हल्ल्यात जखमी
दोन दिवसांपूर्वीच साखरपा, जाधववाडी येथील एक महिला बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता ही दुसरी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी
माजी सभापती जया माने यांनी रुग्णालयात जाऊन जखमी अमित जाधव यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. त्यांनी वन अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सलग दुसरी घटना घडल्याने बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी केली. यावर बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पुढील कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
वनाधिकारी तौफिक मुल्ला यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे येऊन जखमी अमित जाधव याची चौकशी केली. डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला रत्नागिरी येथे हलविण्यात आले. त्यावेळी उपचारासाठी होणारा सर्व खर्च शासनाकडून होणार असल्याचे मुल्ला यांनी सांगितले.
हेही वाचा 

गॅस टँकर पलटी झाल्याने कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग सहा तासानंतर पूर्ववत
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर दाभोळेत गॅस टँकर उलटल्याने मार्ग बंद
रत्नागिरी : मंडणगड तालुक्यात आढळली अश्मयुगीन कातळशिल्पे