पोलिसांचा जळगावात रूट मार्च; एसआरपी च्या चार तुकड्या तैनात

पोलिसांचा जळगावात रूट मार्च; एसआरपी च्या चार तुकड्या तैनात

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – जामनेर तालुक्यातील केतक निंभोरा या गावातील सहा वर्ष मुलीवर चिंचखेडा येथे आरोपीने बलात्कार करून खून केला होता. आरोपीला भुसावळ येथून अटक केल्यानंतर जामनेरला ताब्यात देण्यासाठी जामनेर पोलिस ठाण्यावर गुरुवार (दि.२०) रात्री दगडफेक करण्यात आली. यामध्ये एक पोलीस निरीक्षक व दहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जामनेर व जळगाव येथे उपचार सुरू असून जिल्हाधिकारी यांनी भेट घेतलेली आहे. तर शुक्रवार (दि.२१) रोजी जामनेरमध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेसाठी संपूर्ण शहरात रूट मार्च केला आहे. जागोजागी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तर अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी शांततेचे आव्हान केले आहे.
जामनेर तालुक्यातील चेतक निंभोरा येथील सहा वर्षे मुलीवर बलात्कार करणारा आरोपी सुभाष उमाजी भिल्ल याला पोलिसांनी भुसावळ येथून अटक केली होती. याची माहिती मिळतात जामनेर पोलीस ठाण्यावर गुरुवार (दि.२०) रात्री साडेदहा ते अकरा वाजता मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला व त्यांनी आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली. मात्र पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता जमावणे मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. या दगडफेकी मध्ये जामनेर पोलीस स्टेशनचे संपूर्ण काच व इतर सामानाची तोडफोड केली. यामध्ये पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह दहा कर्मचारी जखमी झालेले आहेत. जखमींवर जामनेर व जळगाव येथे उपचार करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जखमींची भेट घेऊन योग्य ते उपचार करण्यात येण्याच्या सूचना मेडिकल कॉलेजचे डीन यांना दिलेले आहेत.
जामनेरमध्ये कडेकोट बंदोबस्त
वीस रोजी झालेल्या दगडफेकीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील दोन एस आर पी व धुळे येथील दोन एस आर पी अशा एकूण चार एस आर व्ही जामनेर दाखल झालेले आहेत याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस स्टेशन मधून प्रत्येकी सात ते आठ कर्मचारी यांची नियुक्ती जामनेर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे जामन्यात मोठ्या प्रमाणात फाटा व बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास जामनेर शहरात पोलिसांनी अडीच अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च केला


यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी शहरवासीयांना आवाहन केले आहेत की त्यांनी आपले दैनंदिन व्यवहार सुरू ठेवावे कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये संपूर्ण व्यवहार सुरळीत ठेवावे व शांततेचा आव्हान त्यांनी यावेळी केलेले आहेत
दगडफेकीमध्ये हे पोलीस कर्मचारी जखमी झाले
पोलीस निरीक्षक किरण शिंदे, रामदास कुंभार, सुनील दीपचंद राठोड, रमेश शंकर कुमावत, प्रीतम सुधाकर बरकले, हितेश गणेश महाजन, संजय शांताराम खंडारे, अतुल सुभाष पवार, आकाश गोकुळ पाटील, भावेश प्रकाश देवरे, कृष्णा नामदेव शेळके, मेहून मनोज कुमार शहा, राहुल प्रमोद निकम, उत्तम विठोबा चौधरी, किरण चंदुकर, दीपक कारभारी रोटे, विजय सुनील काळे, जितेंद्र नथू ठाकरे.
पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज मधून आरोपींना धरपकडची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू केलेली आहे. पोलिसांनी आतापर्यंत आठ ते दहा आरोपींना रात्री ताब्यात घेतले आहे तर उर्वरित आरोपींची शहानिशा करून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या कोणत्याच आरोपीला सोडण्यात येणार नाही. अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली आहे.
हेही वाचा:

बालिका खूनप्रकरण : आरोपीला ताब्यात देण्यासाठी संतप्त जमावाचा पोलिसांवर हल्ला
Womens Health and Yoga : महिलांचे आरोग्य आणि योग