दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपींच्या अटकेसाठी महिलांचा मोर्चा

जळगाव पुढारी वृत्तसेवा- भुसावळ शहरातील भाजपा नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांची  गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येऊन न्याय मिळावा या मागणीसाठी भुसावळ ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर महिला मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन न्यायाची मागणी करण्यात आली. भुसावळ शहरात भाजपाचे नगरसेवक संतोष बारसे व …

दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपींच्या अटकेसाठी महिलांचा मोर्चा

जळगाव Bharat Live News Media वृत्तसेवा- भुसावळ शहरातील भाजपा नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांची  गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येऊन न्याय मिळावा या मागणीसाठी भुसावळ ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर महिला मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन न्यायाची मागणी करण्यात आली.
भुसावळ शहरात भाजपाचे नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांचा जुना सातारा मरी माता मंदिराजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून काही आरोपी अद्यापही फरार आहेत. या आरोपींना तात्काळ अटक करावी व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसेच मेहतर समाजाच्या नागरिकांना सुरक्षा द्यावी तसेच समाजातील कुणावर पुन्हा अशाप्रकारे हल्ला होणार नाही यासाठी म्हणून पोलिसांनी खबरदारी घ्यावी अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना मेहतर समाजाकडून देण्यात आलं. यावेळी मेहतर समाजाचे पदाधिकारी समाजातील पंच महिलावर्ग मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाले होते.
यावेळी महिलांनी घोषणा देऊन जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले होते. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी आंदोलक महिलांनी केली.
हेही वाचा –

Nashik Murder | मुंबई महापालिकेतील लिपिकाचा नाशिकमध्ये खून; पत्नी, मेहुणीनेच रचला कट
Closing Bell | सेन्सेक्स- निफ्टी सपाट, पण Bank Nifty नव्या शिखरावर