माजी सैनिक कंत्राटी कामागारांचे भत्ते मिळण्यासाठी साखळी उपोषण सुरू
जळगाव- भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथे महानिर्मिती प्रकल्पामध्ये माजी सैनिक व त्यांच्या विधवा व त्यांचे पाल्य हे कॉन्ट्रॅक्टर कामगार म्हणून सुरक्षा विभागात आहेत. मात्र यांना फॅक्टरी अॅक्ट नुसार भत्ते मिळत नसल्यामुळे (दि. 19) पासून राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसच्या माध्यमातून साखळी उपोषण सुरू केले आहे.
सुरक्षा विभागातील निविदेत तातडीने परिपत्रक आदेश क्र. ०४५२२ दि. २८/०३/२०११ प्रमाणे भत्ते समाविष्ठ करावे तसेच संदर्भिय बैठकीनुसार आपण सुरक्षा विभागातील कंत्राटी कामगारांच्या भत्यांबाबत वरीष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेवू असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र अद्याप पर्यंत या बाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
पत्र क्रं. वव्य/भुऔविके/सुरक्षा/१४सी/१३०/दि. ०६/०५/२०२४ पत्रातील संदर्भ ५ मधील मेस्को कंपनीच्या वेज स्ट्रक्बरशी आमचा कुठलाही संबंध नसून सदर कंपनी आता महानिर्मिती महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत काम करीत असल्याने त्यांनी महानिर्मितीच्या नियम/कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे.
त्यामुळे परिपत्रक क्र. मास/काऔसं/अ/०४५२२/दि. २८/०३/२०११ प्रमाणे त्यांनी महानिर्मितीचे भत्ते देणे आवश्यक आहे. याबाबत मेस्को कंपनीनेही त्यांच्या परिपत्रक क्र. Mesco/MSPGCL/Deepnagar/Dt. 19/05/2023 प्रमाणे भत्ते देण्यात यावे अशी मागणी केलेली आहे. पत्र क्रं. सकाअ/जळ/संकिर्ण/ औसं/१५८०/ दि. १५/१२/२०२२ प्रमाणे सुरक्षा विभागातील कंत्राटी कामगारांना भत्ते लागू करावे असा आदेश दिलेला आहे. सदर बाब मुख्य अभियंता स्थरावर असल्याने आपण आपल्या स्थरावर याबाबत तातडीने निर्णय घेवून भत्ते देण्याबाबत निर्णय घ्यावा यासाठी माजी सैनिक त्यांच्या विधवा व त्यांचे पाल्य हे सर्वजण साखळी उपोषणाला दिपनगर येथे राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेस माध्यमातून आजपासून उपोषणाला बसले आहेत.
हेही वाचा-
Nashik Murder | मुंबई महापालिकेतील लिपिकाचा नाशिकमध्ये खून; पत्नी, मेहुणीनेच रचला कट
ICC T20 Rankings : आयसीसी टी-20 क्रमवारीत मोठा बदल! ‘या’ खेळाडूंनी बदलले पॉईंट टेबल