जळगावला पोलीस भरतीत पहिल्याच दिवशी 204 उमेदवारांची दांडी
जळगाव Bharat Live News Media वृत्तसेवा- जळगाव जिल्ह्यात आज (दि. 19) पासून पोलीस भरती सुरू झाली आहे. भरतीच्या पहिल्याच दिवशी 500 उमेदवारांना बोलवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात 296 उपस्थित राहिले. त्यापैकी 59 उमेदवार छाती व उंची मध्ये व इतर गोष्टीत अपात्र ठरले तर दोन जणांना मैदानी चाचणीसाठी काही कारणास्तव पुढील तारीख देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.
पहिल्या दिवशी बोलवण्यात आलेले उमेदवार-500
मैदानी तसेच प्रत्यक्ष हजर उमेदवारांची एकूण संख्या-296
अनुपस्थित-204
अपात्र छाती उंची इतर-59
2 जणांना काही कारणांनी मैदानी चाचणी करीता पुढील तारीख दिली आहे.
जळगाव जिल्हा पोलीस घटकांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी शारीरिक चाचणी दि. 19 पासून सुरू करण्यात आली आहे. यासाठी पहिल्या दिवशी पाचशे उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात मैदानी चाचणीसाठी 296 उमेदवार उपस्थित होते. त्यामध्ये मैदानी चाचणीसाठी २३७ उमेदवार पात्र ठरले असून 59 उमेदवार अपात्र ठरले आहे.
दोघांना पुढील तारीख
पहिल्याच दिवशी 204 उमेदवार मैदानी चाचणीसाठी अनुपस्थित राहिले. तर दोघांना काही कारणांमुळे मैदानी चाचणीसाठी पुढील तारीख देण्यात आली आहे. मैदानी चाचणीची सुरुवात सकाळी साडेचार वाजेपासून पोलीस कवायत मैदानावर झाली. यावेळी संपूर्ण चाचणी ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत घेण्यात आली.
हेही वाचा-
Jalgaon | दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपींच्या अटकेसाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Jalgaon News | टेलीग्राम, व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून वेगवेगळे टास्क, तरूणाला पावणेतेरा लाखाचा लावला चुना