आयआयएम अमृतसरच्या विद्यार्थ्यांचे अनोखे आंदोलन; पहा व्हायरल व्हिडीओ

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबमध्ये सध्या तीव्र उखाडा सुरु आहे. दरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अमृतसरच्या (आयआयएम) विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात एसीची सुविधा दिलेली नाही. उखाड्याच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांनी लक्षवेधी पद्धतीने आंदोलन केले आहे. आयआयएम अमृतसरच्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या मेस कम कॅन्टीनमध्ये झोपून निषेध आपला निषेध दाखवला आहे. व्यवस्थापन संस्थेच्या मेस आणि कॅन्टीनमध्ये एसी सुविधा देऊ शकते, मात्र वसतिगृहात राहणाऱ्या …

आयआयएम अमृतसरच्या विद्यार्थ्यांचे अनोखे आंदोलन; पहा व्हायरल व्हिडीओ

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पंजाबमध्ये सध्या तीव्र उखाडा सुरु आहे. दरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अमृतसरच्या (आयआयएम) विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात एसीची सुविधा दिलेली नाही. उखाड्याच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांनी लक्षवेधी पद्धतीने आंदोलन केले आहे. आयआयएम अमृतसरच्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या मेस कम कॅन्टीनमध्ये झोपून निषेध आपला निषेध दाखवला आहे.
व्यवस्थापन संस्थेच्या मेस आणि कॅन्टीनमध्ये एसी सुविधा देऊ शकते, मात्र वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना एसी सुविधा दिली जात नसल्यामुळे विद्यार्थांनी हे अनोखे केल्यांचे सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांना कडक उन्हात अभ्यास करणे कठीण होत आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओही व्हायरल केला आहे, ज्यामध्ये विद्यार्थी कॅन्टीनमध्ये झोपलेले दिसत आहेत. संस्था विद्यार्थांकडून भरमसाठ फी घेतात. त्यामध्ये दोन वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी 25 लाख रुपये फी घेतली जाते. मात्र वसतिगृहात सुविधा दिल्या जात नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. याबाबत प्रशासनाकडे विद्यार्थ्यांनी अनेकवेळा देखील आवाज उठवला आहे, मात्र याबाबत कोणीही अधिकारी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नाही.

IIM Amritsar students protested against the management to get AC installed in their hostel by sleeping in the library that has AC. One of them said, “Modern problem requires modern solution” 😂 pic.twitter.com/d8D6rl9G9Q
— Shubh (@kadaipaneeeer) June 14, 2024

या प्रकरणाबाबत आयआयएम अमृतसरचे संचालक डॉ. नागराजन राममूर्ती यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केली होती. संस्थेने वसतिगृहाची इमारत भाड्याने घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या मुख्य वसतिगृहाचे सध्या बांधकाम सुरू आहे. सध्याच्या वसतिगृहाच्या इमारतीतील वीज पुरवठा लाईन्स हेवी व्होल्टेज सहन करण्यास सक्षम नाहीत. उष्णतेचा सामना करण्यासाठी येत्या काही दिवसांत वसतिगृहाच्या खोल्यांमध्ये एअर कुलर बसवण्यात येणार आहेत.
हेही वाचा :

विधानसभेत राष्ट्रवादी ८० ते ९० जागांवर लढवणार : प्रफुल्ल पटेल
EVM| ‘ईव्हीएम’ हॅक करता येत नाही; निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांचा खुलासा
कोरोनापेक्षाही भयंकर रोग आला; ४८ तासांत होतो मृत्यू

Go to Source