परभणी : आव्हई येथील क्रांती बुचाले हिची इस्रो सहली साठी निवड
पूर्णा, Bharat Live News Media वृत्तसेवा : आव्हई (ता. पुर्णा) येथील जिल्हा परिषद प्रशाळेतील विद्यार्थीनी क्रांती नामदेव बुचाले हिची इस्त्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. उत्तुंगतेज फाऊंडेशनव्दारा घेण्यात आलेल्या बालवैज्ञानिक स्पर्धातून या विद्यार्थीनीची निवड झाली आहे. या स्पर्धेमध्ये क्रांतीने राज्यात 15वा क्रमांक पटकावला आहे. या परिक्षेसाठी राज्यभरातून 3 हजार विद्यार्थीनी सहभाग घेतला होता.
दरम्यान प्रसिद्ध झालेल्या गुणवत्ता यादीनुसार 300 विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये इयत्ता 5 वी आणि 7 वी गटामधून 150 तर 8 वी ते 10 वी गटातून 150 विद्यार्थी होते. ऑनलाइन पध्दतीने झालेल्या मुलाखतीतून 65 विद्यार्थ्यांची इस्रो, आयआयटी सायन्स सिटी येथे विज्ञान अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. सदर परिक्षेकरीता क्रांतीला गटशिक्षणाधिकारी मोकमोड, केंद्रप्रमुख व्हि. एस. जडीतकर, व्हि. एस. सुर्यवंशी, एम. एन. पिसाळ, मुख्याध्यापक पि.जी. कऱ्हाळे यांनी मार्गदर्शन केले.
हेही वाचा :
साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद : भारत सासणे
‘घरत गणपती’ : अजिंक्य देव-आश्विनी भावे पुन्हा जोडी जमणार
डॉ. आर. व्ही. पोवार यांचे युपीएससी परीक्षेमध्ये यश; केंद्रात वरिष्ठ कृषी अभियंतापदी निवड