यवतमाळ : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षाचा करावास

यवतमाळ : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षाचा करावास

यवतमाळ, Bharat Live News Media वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीला मारहाण करून अत्याचार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षे शिक्षा आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा, दारव्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश अ. बा. भस्मे यांनी शिक्षा सुनावली. राहुल बंडूजी ढेकळे (वय.24 रा, उत्तरवाढोणा) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी ढेकळेने 12 नोव्हेंबर 2014 मध्ये पीडित मुलीच्या लहान बहिणीला १० रुपये देऊन दुकानात खाऊ आणण्यास पाठविले. त्यावेळी पीडित मुलीसोबत अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न केला. मुलीने नकार दिल्यानंतर आरोपीने तिला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. यानंतर सर्व घटनेची माहिती मुलीने तिच्या आईला सांगितली. पीडितीच्या आईने लाडखेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. सहायक पोलिस निरीक्षक क्षीरसागर यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण १२ साक्षी तपासण्यात आले. शासनातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता दिलीप एम. निमकर यांनी काम पाहिले.
हेही वाचा :

कोल्हापूर : कलनाकवाडी येथे बुलेटच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
आव्हई येथील क्रांती बुचाले हिची इस्रो सहली साठी निवड
परभणी : तळतूंबा येथील शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू