चंद्रपूर : महावितरण कर्मचाऱ्याला विद्युत खांबाला बांधून संरपंचाकडून मारहाण

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : महावितरणच्या कर्मचाऱ्याला विद्युत खांबाला बांधून सरपंचाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि.१५) चंद्रपुरात उघडकीस आला. महावितरणच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार घुग्घुस पोलीस ठाण्यात संरपंचाविरूद्धात गुन्हा दाखल करण्यात आला.  सुरज परचाके असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, घुग्घुस महावितरणचा कर्मचारी सुरज परचाके यांच्याकडे उसगाव आणि नकोडा या गावाचा प्रभार आहे. नेहमी …

चंद्रपूर : महावितरण कर्मचाऱ्याला विद्युत खांबाला बांधून संरपंचाकडून मारहाण

चंद्रपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : महावितरणच्या कर्मचाऱ्याला विद्युत खांबाला बांधून सरपंचाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि.१५) चंद्रपुरात उघडकीस आला. महावितरणच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार घुग्घुस पोलीस ठाण्यात संरपंचाविरूद्धात गुन्हा दाखल करण्यात आला.  सुरज परचाके असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, घुग्घुस महावितरणचा कर्मचारी सुरज परचाके यांच्याकडे उसगाव आणि नकोडा या गावाचा प्रभार आहे. नेहमी प्रमाणे  शनिवारी (दि.१५) परचाके उसगावला निघाले होते. मार्गात नकोडा येथील सरपंच किरण बंदुरकर यांनी त्यांना एसीसी सिमेंट कंपनी जवळ अडविले. बंदुरकर यांनी त्यांना डीपीजवळ काम असल्याचे सांगून नकोड्याला घेवून गेले. नकोड्याला गेल्यावर त्यांनी महावितरण कर्मचारी परचाके यांना त्याच्याच दुपट्ट्याने विद्युत खांबाला बांधले. त्यानंतर गावकऱ्यांना गोळा केले. साधारण: दोन तास त्यांनी कर्मचाऱ्याला बांधून ठेवले. यामध्ये मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. घुग्घुस महावितरणचे सहायक अभियंता नयन भटारकर यांना याची माहिती मिळताच भटारकर यांनी घटनास्थळी जाऊन परचाके यांना सोडविले. मागील काही दिवसापासून नकोडा येथील विद्युत पुरवठा अनियमितपणे सुरू आहे. त्या रागातून सरपंचाने केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहेत.
हेही वाचा :

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षाचा करावास
परभणी : तळतूंबा येथील शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू
परभणी : तळतूंबा येथील शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू