रायगड : तळोजामध्ये आणखी 45 लाखांचे अमली पदार्थ जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
रायगड, Bharat Live News Media वृत्तसेवा : तळोजा येथे शनिवारी (दि.15) रायगड राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाने 1 कोटी रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. गांजा, दोन आरोपी आणि एक वाहन असा 45 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे रायगड जिल्हा अधिक्षक आर. आर. कोले यांनी दैनिक Bharat Live News Mediaसोबत बोलताना दिली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पनवेल भरारी पथक क्रमांक दोनने बुधवारी (दि.12) सांयकाळी पनवेल मुंब्रा हायवेच्या स्टार वेल्डींग वर्कसच्या समोर तळोजे पाचनंद येथे 1 कोटी रूपये किमंतीचा गांजा आणि चारचाकी वाहन जप्त करुन दोन आरोपींना अटक केली होती. या आरोपींना शनिवारी प्रथम वर्ग न्यायालय पनवेल यांचे समोर हजर केले होते. न्यायालयाने आरोपींना 19 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या आरोपींना चौकशीसाठी कार्यालयात आणले असता आरोपी परवेझ शेख याच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. यानंतर फोनच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अज्ञात माणसाला हा गांजा घेऊन तक्का पनवेल येथे जुना मुंबई-पुणे रोडवर पंचमुखी मारूती मंदिर समोर ये असे बोलले. त्यानुसार हनोझ होशी इंगीनीर (रा. लोणावळा ) दिवा उंबरे हे दोघे चारचाकीने तो गांजा घेऊन तक्का पनवेल येथे आले. यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सापळ्यात सापडले. या दोन आरोपींच्या ताब्यातून 135 किलो गांजासह एक चारचाकी वाहन असा एकुण 45 लाख 75 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करुन सहआरोपी म्हणून अटक केली आहे.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, कोकण उप-आयुक्त प्रदिप पवार, रायगड अधीक्षक आर. आर. कोले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे, निरीक्षक उत्तम आव्हाड, दुय्यम निरीक्षक डी. सी. लाडके, एन. जी. निकम, प्रविण माने, कृष्णा देवरे, अजित बडदे, गणेश कुदळे तसेच सहा. दु. नि. जी. सी. पालवे, सखाराम पवार यांच्या पथकाने केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास अधीक्षक आर. आर. कोले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे हे करत आहेत.
हेही वाचा :
तळोजामध्ये ६५ लाखांचे अमली पदार्थ जप्त; नवी मुंबई पोलिसांची कामगिरी
लोकसभा निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ
भाजपने ओबीसी नेत्यांना संपविण्याचा काम केले : पटोलेंचा घणानात