
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लग्नानंतर दाक्षिणात्य आणि बॉलिवूडची अभिनेत्री तापसी पुन्हा एकदा धुमाकूळ घालताना दिसत आहे. लाल साडीमध्ये तापसीने समुद्रकिनारी आपल्या अदा दाखवत इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. तापसी पन्नूचे इंटरनेटवर फोटो व्हायरल झाले आहेत. तापसी नेहमी आपल्या पर्सनल आणि फ्रोफेशनल आयुष्याविषयी चर्चेत राहते. पण तिला आपले वैयक्तिक जीवनाविषयी सांगायला कधीच आवडत नाही.
अधिक वाचा –
कल्की 2898 AD मध्ये दिशा पटानीची एक झलक पाहण्यासाठी फॅन्स उत्सुक
नुकताच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तिने समुद्रकिनारी बसून एकापेक्षा एक फोटो क्लिक केले आहेत. समुद्राची सैर अन् झुळझुळत्या वाऱ्याचा आनंद घेतना ती दिसतेय. कर्ली लूक करून, नाकात बाली अन् लाईट मेकअप अशा स्टाईलनेसोबत तिने फोटो क्लिक केले आहेत.
अधिक वाचा –
पंचायत थ्री फेम जितेंद्रच्या ‘कोटा फॅक्टरी ३’ चा ट्रेलर रिलीज
‘हसीन दिलरुबा’ चा ट्रेलर रिलीज
थ्रिलर चित्रपट ‘हसीन दिलरुबा’ची चर्चा काही दिवसांपासून आहे. या चित्रपटात विक्रांत मेसी आणि हर्षवर्धन राणे यांच्यासोबत तापसीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळेल. चित्रपटाचे दिग्दर्शन विनील मॅथ्यू यांचे आहे. हा चित्रपट २ जुलै २०२१ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. याआधी निर्मात्यांनी दमदार ट्रेलर रिलीज केला आहे.
अधिक वाचा –
कन्नड अभिनेता दर्शन यांच्या अडचणीत वाढ, हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी घेतले ताब्यात
ट्रेलरमध्ये तापसी पन्नू, हर्षवर्धन राणे आणि विक्रांत मसी यांच्यामध्ये लव्ह ट्रँगल पाहायला मिळत आहे. ‘हसीन दिलरुबा’ मध्ये तापसी अभिनेता विक्रांतच्या पत्नीच्या भूमिकेत दिसेल.
