अयोध्येची सुरक्षा अभेद्य: NSG युनिट स्थापन होणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्री रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीनंतर आता अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था (Ayodhya Security) कडक करण्यात आली आहे. केंद्र सरकार आता येथे एनएसजी (NSG) कमांडो युनिट स्थापन करण्याची तयारी करत आहे. त्यासाठी जमिनीचा शोध सुरू आहे. या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर एनएसजीचे ब्लॅक कॅट कमांडो येथे तैनात केले जाणार आहेत. अयोध्येत  NSG युनिटची स्थापना …

अयोध्येची सुरक्षा अभेद्य: NSG युनिट स्थापन होणार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : श्री रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीनंतर आता अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था (Ayodhya Security) कडक करण्यात आली आहे. केंद्र सरकार आता येथे एनएसजी (NSG) कमांडो युनिट स्थापन करण्याची तयारी करत आहे. त्यासाठी जमिनीचा शोध सुरू आहे. या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर एनएसजीचे ब्लॅक कॅट कमांडो येथे तैनात केले जाणार आहेत.
अयोध्येत  NSG युनिटची स्थापना कशासाठी?

अयोध्या दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर
राममंदिराच्या उभारणीनंतर व्हीव्हीआयपीच्या भेटी वाढल्या
भाविकांच्या गर्दीत मोठी वाढ
केंद्र सरकारकडून एनएसजी युनिट सुरू करण्याची तयारी

Ayodhya Security : दिल्लीतून एनएसजी कमांडो बोलावले जातात.
जिल्ह्यात आतापर्यंत केंद्र सरकारच्या दोन आणि राज्य सरकारच्या चार सुरक्षा यंत्रणा तैनात आहेत. कोणत्याही व्हीव्हीआयपी भेटीत दिल्लीतून एनएसजी कमांडो बोलावले जातात. राममंदिराच्या उभारणीनंतर जिल्ह्यात व्हीव्हीआयपींच्या भेटी वारंवार होत असून येथे भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे.
अयोध्येला देखील वारंवार दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असते. त्यामुळे आता येथील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. यासाठी भविष्यात येथे एनएसजी कमांडोची एक तुकडी स्थापन करण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनएसजी टीमने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून जागा उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. ज्यावर वेगाने काम सुरू आहे. त्याचवेळी पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार यांनी सांगितले की, अयोध्येत एनएसजी युनिट सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे, मात्र, याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही.
हेही वाचा 

अयोध्या : प्राणप्रतिष्ठेपासून आतापर्यंत दीड कोटी लोकांनी घेतले रामलल्लाचे दर्शन; दरराेज १ लाख भक्‍तांची हजेरी
एसटी महामंडळाची अयोध्या दर्शन यात्रा : प्रायोगिक तत्त्वावर निर्णय
भाजप आणि मित्रपक्षांचे मुख्यमंत्री मंत्रिमंडळासह करणार अयोध्यावारी