मुंबई ; Bharat Live News Media ऑनलाईन तिसऱ्यांदा मोदी सरकार येउन देखील काश्मीरमध्ये हल्ले सुरूच आहेत. काश्मीर पुन्हा पेटलंय, ३७० कलम काढलं नव्हे तर ते होल्डवर ठेवलंय. वर्षभरानंतर का होईना भागवत मणिपूरवर बोलले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा आतातरी मणिपूरमध्ये जाणार आहेत का? भागवतांचं बोलण मोदी आतातरी गांभीर्याने घेणार आहेत का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांना ठाकरे सेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. अनिल परबांच्या जाहिरनाम्याचं उद्धव ठाकरें यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी ते बोलत होते.
मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परब यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केल्या प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. कोकण, नाशिकच्या जागेत काँग्रेस आणि शिवसेनेत वाटाघाटी होतील असे ते म्हणाले. दरम्यान माझं पदवी प्रमाणपत्र खोटं नाहिए म्हणत त्यांनी मोदींना टोला लगावला.
हेही वाचा :
सुनेत्रा पवार यांची लवकरच राज्यसभेवर नियुक्ती होणार
आंध्रात चंद्राबाबू नायडूंचा ‘चौकार’, मुख्यमंत्रीपदी शपथबद्ध, पवन कल्याण यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
‘सीमा हैदर,चार मुलं परत कर’: पतीची बाल हक्क आयोगाकडे धाव