जरांगेंची प्रकृती खालावली; उपचार घेण्यास नकार
वडीगोद्री, Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचे चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांनी पाण्याचा एक थेंबही घेतलेला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली आहे. मात्र, जरांगे यांनी उपचार घ्यायला नकार दिला आहे. मनोज जरांगे यांचा बीपी खालावला आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे.
आज सकाळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आहे. यामध्ये त्यांचा बीपी आणि शुगर तपासली. त्यामध्ये डॉक्टरांना बीपी खालावल्याचे दिसून आले. त्यांच्यावर उपचार घेण्यासाठी त्यांना सांगण्यात आले आहे. पण त्यांनी मी उपचार घेणार नाही, माझी भूमिका कायम आहे. जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत मी उपचार घेणार नाही असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :
जालना : सरकारकडून माझा गोड बोलून काटा काढण्याचा डाव; जरांगे यांचा सरकारवर गंभीर आरोप
आंध्र प्रदेश उपमुख्यमंत्रीपदासाठी अभिनेते पवन कल्याण आग्रही!
कन्नड अभिनेता दर्शन यांच्या अडचणीत वाढ, हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी घेतले ताब्यात