नाशिक: आजपासून अकरावी प्रवेशाचे ऑनलाइन मेरिट फॉर्म

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान, एचएसव्हीसीसाठी प्रवेश घेण्यासाठी मंगळवा (दि. ११) पासून ऑनलाइन मेरिट फॉर्मप्रक्रिया सुरू होणार आहे. शहरातील इतर महाविद्यालयांमध्येही ११ वी प्रवेशप्रक्रियेला वेग आला आहे. मविप्रसाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या संकेतस्थळावर मेरिट फॉर्म विहित मुदतीत भरून द्यायचा आहे. मेरिट फॉर्म हव्या असलेल्या मविप्रच्या विविध कनिष्ठ (नाशिक …

नाशिक: आजपासून अकरावी प्रवेशाचे ऑनलाइन मेरिट फॉर्म

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा – मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान, एचएसव्हीसीसाठी प्रवेश घेण्यासाठी मंगळवा (दि. ११) पासून ऑनलाइन मेरिट फॉर्मप्रक्रिया सुरू होणार आहे. शहरातील इतर महाविद्यालयांमध्येही ११ वी प्रवेशप्रक्रियेला वेग आला आहे.
मविप्रसाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या संकेतस्थळावर मेरिट फॉर्म विहित मुदतीत भरून द्यायचा आहे. मेरिट फॉर्म हव्या असलेल्या मविप्रच्या विविध कनिष्ठ (नाशिक मनपा क्षेत्र वगळता) महाविद्यालयांच्या नावाने भरावा लागणार आहे. मेरिट फॉर्म पडताळणी व जमा करणे आदी प्रक्रिया संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयांत होणार आहे. दरम्यान मेरिट फॉर्म भरण्यासंबंधी मार्गदर्शन व फॉर्म भरण्याची सुविधा जवळच्या मविप्रच्या कनिष्ठ महाविद्यालयात (नाशिक मनपा क्षेत्र वगळता) उपलब्ध करून देण्यात आली होती. ऑनलाइन मेरिट फॉर्मची पडताळणी, दुरुस्ती व जमा करण्यासाठी शेवटची तारीख १८ जून आहे. प्रवेशप्रक्रियेविषयी सविस्तर माहिती संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
सद्यस्थितीत नाशिक महापालिका क्षेत्रातील ६८ महाविद्यालयांनी प्रवेशप्रक्रियेत सहभाग घेतला आहे. त्या सर्व महाविद्यालयांमध्ये एकूण २७ हजार ७६० जागा उलपब्ध आहेत. पूर्वीच्या २५ हजार २४४ जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे. या जागांसाठी ५ जूनपासून विद्यार्थी अर्जाचा भाग दोन भरत आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पर्याय व शाखा निवडीसाठीचा अर्ज दाखल करता येत आहेत. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांना १६ जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्जाचा भाग एक व दोन भरता येणार आहे. याच मुदतीत कोटा प्रवेशाची प्रक्रिया पार पडणार आहे.
हेही वाचा:

SSC Result 2024 | दहावी गुणपत्रिकांचे आज शाळांमध्ये होणार वाटप
Maratha Reservation|उपोषणाचा चौथा दिवस, जरांगे-पाटील उपचार न घेण्यावर ठाम