सीपीआर परिचर्या महाविद्यालयातील 3 मुली 24 तासांनंतर सुखरूप

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयतील तीन विद्यार्थिनी रविवारी दुपारपासून गायब झाल्या होत्या. 24 तासांनंतर या तीन मुली महाविद्यालयात सुखरूप परतल्यानंतर सीपीआर प्रशासन आणि पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सीपीआरमध्ये परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय आहे. येथे जी.एन.एम. 3 वर्षे आणि ए.एन.एम.च्या 2 वर्षांच्या प्रशिक्षणासाठी विद्यार्थिनी प्रवेश घेतात. गुणवत्तेप्रमाणेच येथे प्रवेश मिळतो. रविवारी …

सीपीआर परिचर्या महाविद्यालयातील 3 मुली 24 तासांनंतर सुखरूप

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयतील तीन विद्यार्थिनी रविवारी दुपारपासून गायब झाल्या होत्या. 24 तासांनंतर या तीन मुली महाविद्यालयात सुखरूप परतल्यानंतर सीपीआर प्रशासन आणि पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
सीपीआरमध्ये परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय आहे. येथे जी.एन.एम. 3 वर्षे आणि ए.एन.एम.च्या 2 वर्षांच्या प्रशिक्षणासाठी विद्यार्थिनी प्रवेश घेतात. गुणवत्तेप्रमाणेच येथे प्रवेश मिळतो. रविवारी सुट्टीदिवशी विद्यार्थिनींना खरेदीसाठी दुपारी 3 ते 6 या वेळेत सोडले जाते. जाताना त्यांची आऊट आणि इन या वेळेची नोंद करून घेतली जाते. नेहमीप्रमाणे विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणींसोबत खरेदीसाठी बाहेर पडतात. त्या वेळेत महाविद्यालयात पोहोचल्या नाहीत तर येण्यास विलंब का झाला, याचा लेखी खुलासा प्रशिक्षण महाविद्यालय प्रशासनाला द्यावा लागतो.
रविवारी (दि. 9 ) प्रशिक्षण महाविद्यालयातील काही विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे खरेदीसाठी बाहेर पडल्या. काही विद्यार्थिनी वसतिगृहात थांबल्या. खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांमधील तीन मुली रात्री महाविद्यालयाच्या वसतिगृहाकडे परतल्या नसल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. संबंधित मुलींना रात्री 7.30 वाजता मोबाईलवरून प्रशासनाने संपर्क केला; पण या तिघींचे मोबाईल बंद लागले. महाविद्यालय प्रशासनाने त्वरित पालकांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. पालकांनीही त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचे मोबाईल स्विचऑफ होते. सोमवारी मुलींचे पालक कोल्हापुरात पोहोचले. त्यांनी महाविद्यालय प्रशासनाशी चर्चा केली. सोमवारी महाविद्यालय प्रशासनाचा विद्यार्थिनींशी मोबाईलवर संपर्क झाला. तुम्ही कोठे आहात, अशी विचारणा केली, तेव्हा या मुलींनी पुण्यामध्ये असल्याचे सांगितले. या उत्तरामुळे प्रशासन चक्रावून गेले. पुन्हा पालकांनी फोन केला असता त्यांनी गेट टुगेदरला मैत्रिणींकडे गेल्याचे सांगून सोमवारी दुपारी कोल्हापुरात येणार असल्याचे सांगितले.
तोपर्यंत परिचर्या महाविद्यालयातील शिक्षक, पालक आणि सीपीआर प्रशासन पुण्याच्या दिशेने डोळे लावून विद्यार्थिनींची वाट पाहत होते. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास या मुली सीपीआर येथे पोहोचल्या. यानंतर पालकांसह प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.