कोल्हापूर : कासारवाडी फाट्यावरील खड्डे शेवटी नागरिकांनीच बुजवले

कासारवाडी; पुढारी वृत्तसेवा : टोपहून कासारवाडी या महामार्गावर कासारवाडी फाट्याला ठिकठिकाणी खड्डे पडले असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खड्यात पाणी साचल्याने या खड्डांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. यामुळे सोमवारी (दि.१०) येथील नागरिकांनी पुढाकार घेत स्वखर्चाने हे खड्डे बुजवले. पुणे-बेंगलुरु राष्ट्रीय महामार्गालगत तूप …

कोल्हापूर : कासारवाडी फाट्यावरील खड्डे शेवटी नागरिकांनीच बुजवले

कासारवाडी; Bharat Live News Media वृत्तसेवा : टोपहून कासारवाडी या महामार्गावर कासारवाडी फाट्याला ठिकठिकाणी खड्डे पडले असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खड्यात पाणी साचल्याने या खड्डांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. यामुळे सोमवारी (दि.१०) येथील नागरिकांनी पुढाकार घेत स्वखर्चाने हे खड्डे बुजवले.
पुणे-बेंगलुरु राष्ट्रीय महामार्गालगत तूप येथून कासरवाडी मार्गे जाणारा राज्य मार्ग आहे. राज्यमार्ग जोतिबा पन्हाळा सह रत्नागिरी महामार्गाला जाऊन मिळतो. कासारवाडी फाट्यालाच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात थोडा जरी पाऊस आला तरी आजूबाजूला नाले नसल्याने या रस्त्यावर पाणी येते तर उन्हाळ्यात रस्त्याला लागून असणाऱ्या पाणीपुरवठा पाईपला गळती असल्याने उन्हाळ्यात सुद्धा रस्त्यावर पाणी साचते. यामुळे इथला खड्डा अधिकच मोठा होत चालला आहे. याचा त्रास येथून प्रवास करणाऱ्या असंख्य वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. हे पाहून येथील तंटामुक्त अध्यक्ष संतोष शिंदे व टोपचे वैभव पाटील यांनी स्वखर्चाने हे खड्डे मुरूमाने भरले. यामुळे प्रवाशाना थोडासा दिलासा मिळणार आहे.
उन्हाळ्यात व पावसाळ्यात सुध्दा या रस्त्यावर पाणी साचत असल्याने खड्डा अधिकाधिकच मोठा होत होता. यावर पाणी आल्याने नवीन वाहन चालकांना याचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात होत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे वेळेची लक्ष द्यावे.
संतोष शिंदे, अध्यक्ष, तंटामुक्त समिती, कासारवाडी
 
हेही वाचा :

कोल्हापूर : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान, चाहत्यांचा साखर-पेढे वाटून जल्लोष
कोल्हापूर: खिद्रापूर येथे अतिक्रमणाच्या निषेधार्थ रस्त्यावरच थाटले दुकान
कोल्हापूर : कुरुंदवाड परिसरात गांजा विक्रीत वाढ; कारवाईकडे दुर्लक्ष