नीट परीक्षा निकाल घोळाबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नीट परीक्षा निकाल घोळाबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

प्रथमेश तेलंग

नवी दिल्ली : नीट परीक्षेत पेपरफुटी व निकालात घोळ झाल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर उद्या मंगळवारी (दि.१०) सुनावणी होणार आहे. नीट परीक्षा घोळाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एक समितीही गठित केली आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत नीट परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयातही याचिका दाखल झाली आहे.
ग्रेस गुण मिळाल्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका
आंध्र प्रदेशातील कार्तिक नावाच्या विद्यार्थ्याने विद्यार्थ्यांना परीक्षेत ग्रेस गुण देण्याच्या राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे . नीट परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याने १५३६ विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात आले आहे. मेघालय, हरियाणा, छत्तीसगड, सुरत आणि चंदीगडसह राज्यातील ६ परिक्षा केंद्रांतील विद्यार्थ्यांनी याबाबत तक्रार केली होती.नीट परिक्षेतील या गोंधळावर राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालक सुबोध कुमार सिंह यांनी परीक्षेत पेपरफुटी व घोळ झाला नसल्याचे पत्रकारपरिषद घेऊन स्पष्ट केले होते.