गृह, संरक्षण, अर्थ, रेल्वे, रस्ते मंत्रालय भाजपकडेच

गृह, संरक्षण, अर्थ, रेल्वे, रस्ते मंत्रालय भाजपकडेच

प्रथमेश तेलंग

नवी दिल्ली : रालोआ सरकारमध्ये भाजपने महत्वाची खाती स्वतःकडेच ठेवली आहेत. सरकारमधील गृह, संरक्षण, अर्थ, रेल्वे आणि रस्ते वाहतूक या मंत्रालयामध्ये मंत्र्यांचाही बदल केला नाही. २०१९ च्या सरकारमध्ये ज्या मंत्र्यांकडे ही खाती होती. त्याच मंत्र्यांकडे भाजपने या खात्यांचा कारभार ठेवला आहे. तर मित्र पक्षांना केवळ ५ कॅबिनेट मंत्रीपदे दिली आहेत.
सरकारमधील गृह आणि सहकार मंत्रालय अमित शहांकडे, संरक्षण मंत्रालय राजनाथ सिंहांकडे, अर्थ मंत्रालय निर्मला सीतारामण यांच्याकडे, रेल्वे मंत्रालयासह इलेक्ट्रॉनिक मंत्रालय अश्विनी वैष्णवांकडे, तर महाराष्ट्रातील नितीन गडकरी यांच्याकडे त्यांचे रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग खाते ठेवले आहे. तर कायदा मंत्रालयाचा राज्यमंत्रीपदाचा स्वतंत्र कारभारही भाजपने स्वतःचे नेते अर्जुन राम मेघवाल यांना दिला आहे.