श्री मलंगगडावर दरड कोसळून एकाचा मृत्यू
ठाणे : शुभम साळुंके पाहिल्याच पावसात ठाणे जिल्ह्यात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावर आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जखमींवर उल्हासनगर मधील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यास दुर्घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहेत. मात्र डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या या कुटुंबांना मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात धोका निर्माण होत असतो. धोका असताना देखील या परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास नागरिक येत असतात. सोमवारी पहाटेच्या सुमारास दुर्दैवाने हि घटना घडली असून, एका घरावर दरड कोसळली आहे. दरड कोसळताना मुलाचा जीव वाचवायला गेलेल्या वडिलांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी वन विभागाच्या वतीने परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली होती. मात्र सुरू झालेली कारवाई लवकरच आटोपली. यंदा देखील दरड कोसळली आहे. गुलाम सय्यद (वय ३५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर त्यांचा दीड वर्षांचा मुलगा आणि पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहिती नुसार सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तर मुलाच जीव वाचवायला गेले असताना मुलाचा जीव वाचला मात्र वडील गुलाम सय्यद यांना जीव गमवावा लागला आहे. तर जखमी नाभिया आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा :
माेठी बातमी: मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
मोदी सरकारचा पहिला मोठा निर्णय, किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता जारी
वैष्णोदेवी यात्रेकरुंवरील हल्ल्याची जबाबदारी ‘लष्कर-ए-तोयबा’ने स्वीकारली