पुन्हा ‘टार्गेट किलिंग’..! भारतीय तरुणाची कॅनडामध्‍ये गोळ्या झाडून हत्‍या

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतात २८ वर्षीय भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. युवराज गोयल असे त्‍याचे नाव आहे. स्‍थानिक पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. त्‍यांच्‍यावर खुनाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आल्‍याचे वृत्त ‘ग्‍लोबल न्‍यूज’ने दिले आहे. या प्रकरणी रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी म्‍हटलं आहे की, सरे येथे …
पुन्हा ‘टार्गेट किलिंग’..! भारतीय तरुणाची कॅनडामध्‍ये गोळ्या झाडून हत्‍या

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतात २८ वर्षीय भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. युवराज गोयल असे त्‍याचे नाव आहे. स्‍थानिक पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. त्‍यांच्‍यावर खुनाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आल्‍याचे वृत्त ‘ग्‍लोबल न्‍यूज’ने दिले आहे.
या प्रकरणी रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी म्‍हटलं आहे की, सरे येथे गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्‍काळ घटनास्‍थळी धाव घेतली. गोयल यांची गोळ्या झाडून हत्‍या करण्‍यात आली होती. युवराज गोयल याची बहीण चारू सिंघला यांनी सांगितले की, युवराज हा सरे येथे कार विक्री शोरूममध्ये काम करायचा. युवराज भारतात राहणाऱ्या त्याच्या आईशी फोनवर बोलत होता. कारमधून बाहेर पडताच त्याच्यावर गोळीबार करण्‍यात आला.
सरे रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस (आरसीएमपी) ने एका निवेदनात म्हटले आहे की, हत्‍या प्रकरणी चार संशयितांची ओळख पटली आहे. मनवीर बसरा ( वय 23), साहिब बसरा ( 20), हरकिरत झुट्टी ( 23) आणि केलोन फ्रँकोइस ( 20 ) या चौघांना खून प्रकरणी अटक करण्‍यात आली आहे. युवराज गोयल यांची हत्या का करण्यात आली? याचा तपास सुरु आहे.
हेही वाचा :

इंग्‍लंडमध्‍ये आणखी एका भारतीय तरुणाची हत्या
धक्‍कादायक… अमेरिकेत अपहरण झालेल्या भारतीय वंशाच्या कुटुंबातील चौघांची हत्या, मृतांमध्‍ये 8 महिन्यांच्या मुलीचा समावेश