केरळच्या भाजप खासदारांचा मंत्रीपद सोडण्याचा निर्णय; सांगितले कारण…
नवी दिल्ली ; Bharat Live News Media ऑनलाईन केरळमधून पहिल्यांदाच विजयी होऊन संसदेत पोहोचलेले सुरेश गोपी यांनी काल (रविवार) मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र आता त्यांनी मंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याचे कारण सांगताना ते म्हणाले, मी अनेक चित्रपट साईन केले आहेत. ते मला पूर्ण करायचे आहेत. सुरेश गोपी यांनी त्रिशूर मध्ये खासदाराच्या स्वरूपातच काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आपले मंत्रीपद सोडण्याची शक्यता
केरळहून भाजपचे पहिले खासदार सुरेश गोपी यांनी कालच राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र आता ते आपले मंत्रीपद सोडण्याची शक्यता आहे. शपथ ग्रहण समारंभानंतर त्यांनी दिल्लीतील एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना या विषयी सांगितले. ते म्हणाले, मी कोणतेही मंत्रीपद मागितलेले नाही. मला आशा आहे की, या पदापासून मला मुक्त करण्यात येईल.
केरळमधून भाजपसाठी पहिले खासदार
सुरेश गोपी यांनी त्रिशूर लोकसभेच्या जागेवरून निवडणूक लढवून ती जिंकून केरळमधून भाजपसाठी पहिले खासदार म्हणून आपले नाव इतिहासात नोंदवले आहे. सुरेश यांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार वी. एस. सुनीलकुमार यांचा ७४६८६ मतांनी पराभव केला. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.
सुरेश गोपी यांना बेस्ट ॲक्टरचा राष्ट्रीय पुरस्कार
सुरेश गोपी हे मुळचे केरळचे अलप्पुझाचे रहिवासी आहेत. त्यांचा जन्म १९५८ मध्ये झाला. त्यांनी कोल्लम येथून विज्ञान शाखेतून पदवी संपादन केली. त्यांचा संबंध चित्रपटांशीही आहे. त्यांनी एका बाल कलाकाराच्या स्वरूपात चित्रपटांमध्ये काम करायला सुरूवात केली. सुरेश गोपी यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका वठवल्या आहेत. १९९८ मध्ये आलेल्या कलियाट्टमसाठी त्यांना बेस्ट ॲक्टरचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. यासोबतच त्यांनी बरीच वर्षे टीव्ही शोजही होस्ट केले आहेत.
हेही वाचा :
Lok Sabha Election Results 2024 : राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’मुळे काँग्रेसच्या किती जागा वाढल्या?, जाणून घ्या सविस्तर
पूर्वांचल एक्सप्रेस-वे वर भीषण अपघात : भाविकांच्या बसची उभ्या ट्रकला धडक, ४ ठार; २५ जण जखमी
‘एनडीए’ सरकारला शेअर बाजाराचा ‘सॅल्यूट’! सेन्सेक्स-निफ्टीची उच्चांकी झेप