अक्रोड भिजवून खाणे अधिक लाभदायक

नवी दिल्ली : शरीराला योग्य प्रमाणात पोषक तत्त्वे मिळावीत, यासाठी वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. अनेकजण रोजच्या आहारात सुकामेवा देखील खाताना दिसतात. सुकामेवा खाल्ल्यामुळे पोषक तत्त्वे मिळतात. त्यामध्ये अक्रोडचा देखील समावेश असतो. पण, हे अक्रोड पाण्यात भिजवून खावेत की तसेच खावेत, असा प्रश्न अनेकांना पडतो. तज्ज्ञांच्या मते बदामाप्रमाणेच अक्रोडही भिजवून खाल्ल्याने अधिक लाभ मिळतो. अक्रोडमध्ये ओमेगा-3 …

अक्रोड भिजवून खाणे अधिक लाभदायक

नवी दिल्ली : शरीराला योग्य प्रमाणात पोषक तत्त्वे मिळावीत, यासाठी वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. अनेकजण रोजच्या आहारात सुकामेवा देखील खाताना दिसतात. सुकामेवा खाल्ल्यामुळे पोषक तत्त्वे मिळतात. त्यामध्ये अक्रोडचा देखील समावेश असतो. पण, हे अक्रोड पाण्यात भिजवून खावेत की तसेच खावेत, असा प्रश्न अनेकांना पडतो. तज्ज्ञांच्या मते बदामाप्रमाणेच अक्रोडही भिजवून खाल्ल्याने अधिक लाभ मिळतो.
अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असते. याशिवाय अक्रोडमध्ये लोह, फॉस्फरस, तांबे, प्रथिने, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि सेलेनिअम यांसारख्या पोषक तत्त्वांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होतो. त्यामुळे अक्रोड खाल्ल्याने शरीराला योग्य ती जीवनसत्त्वे मिळतात. उन्हाळ्यात भिजवलेले अक्रोड खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. अक्रोड भिजवल्यामुळे त्यामधील उष्णता कमी होते. त्यामुळे अक्रोड खाण्यापूर्वी रात्रभर पाण्यात भिजत टाकवेत. असे केल्यामुळे त्यामधील उष्णता कमी होते आणि पौष्टिक घटक वाढतात. मात्र, हिवाळ्यात अक्रोड खाताने भिजत घालू नयेत. ते तसेच खावेत. जास्त अक्रोड खाल्ल्याने शरीराला त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिवसभरात केवळ 2 ते 3 अक्रोड खावेत.
लहान मुलांना केवळ एक अक्रोड दिवसभरात खायला द्यावा; पण दररोज अक्रोड खाल्ल्याने शरीराला फायदा होतो. अक्रोड हे अँटिऑक्सिडंटस्ने युक्त आहेत. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत. अक्रोडला कॅलरीयुक्त खाद्यपदार्थ देखील मानले जाते, ज्यामुळे त्याचे कमी प्रमाणात सेवन केल्याने देखील भरपूर ऊर्जा मिळते. यामुळे छातीतील जळजळ कमी होते. अक्रोडातील फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहते. त्यामुळे वाढते वजन कमी होण्यास मदत होते. याचे सेवन केल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. रोज अक्रोड खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. अक्रोड खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.