पोटाच्या बॉवेल डिसिजचे कारण शोधण्यात यश

लंडन : एखाद्या आजाराचे निदान होणे, हे जसे योग्य वेळी उपचार होण्यासाठी महत्त्वाचे असते, तसेच एखाद्या आजाराचे कारण माहिती असणेही, त्यापासून बचाव करण्यासाठी महत्त्वाचे असते. आता इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसिज हा आतड्यांचा गंभीर आजार होण्यामागचं प्रमुख कारण यूकेच्या संशोधकांनी शोधून काढलं आहे. हा आजार असलेल्या लोकांपैकी 95 टक्के जणांच्या डीएनएमध्ये संशोधकांना एक कमकुवत ठिपका आढळला आहे. …

पोटाच्या बॉवेल डिसिजचे कारण शोधण्यात यश

लंडन : एखाद्या आजाराचे निदान होणे, हे जसे योग्य वेळी उपचार होण्यासाठी महत्त्वाचे असते, तसेच एखाद्या आजाराचे कारण माहिती असणेही, त्यापासून बचाव करण्यासाठी महत्त्वाचे असते. आता इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसिज हा आतड्यांचा गंभीर आजार होण्यामागचं प्रमुख कारण यूकेच्या संशोधकांनी शोधून काढलं आहे. हा आजार असलेल्या लोकांपैकी 95 टक्के जणांच्या डीएनएमध्ये संशोधकांना एक कमकुवत ठिपका आढळला आहे. त्यामुळे काही रोगप्रतिकार पेशींना आतड्यांमध्ये अतिरिक्त इन्फ्लेमेशन (एक प्रकारची सूज, जळजळ, दाह) निर्माण करणं शक्य होतं. संशोधकांच्या टीमला आधीच अस्तित्वात असणारी औषधे सापडली आहेत, जी या आजाराला बरं करत असल्याचं प्रयोगशाळेतून प्रयोगांमध्ये दिसून आलं आहे. या औषधांची आता मानवी शरीरावर चाचणी घेतली जाणार आहे.
क्रोन्स डिसिज आणि अल्सरेटीव्ह कोलायटीस हे इन्फ्लमेटरी बॉवेल डिसिज म्हणजे आतड्यांच्या आजाराचे सर्वाधिक आढळणारे प्रकार आहेत. यूकेमधील जवळपास पाच लाख लोकांना हा आजार होत असल्याचा अंदाज आहे. किशोर वयात किंवा तरुणपणात याची अनेकदा सुरुवात होते. इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसिज या आजारात रोगप्रतिकार व्यवस्थेचा अत्यंत गुंतागुंतीचा एक भाग म्हणजे मॅक्रोफेजेस नावाच्या पांढर्‍या रक्त पेशी. या पेशी आतड्याच्या आतील भागाला म्हणजे अस्तरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतात आणि सायटोकाईन्स नावाचं रसायन सोडतात. यातून मोठ्या प्रमाणात इन्फ्लेमेशन होतं म्हणजे खूप जास्त प्रमाणात जळजळ होते किंवा वेदना होतात. फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूट अँड युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील संशोधकांच्या गटानं इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसिज या आजाराचं कारण शोधण्याचा प्रयत्न करताना सखोल जनुकीय किंवा आनुवंशिक विश्लेषण केलं.
यातून त्यांना आढळलं की, डीएनएचा एक भाग इन्फ्लेमेशन नियंत्रित करणारा मॅक्रोफेजेसचा मुख्य घटक असतो. ‘तो पिरॅमिडच्या सर्वात वर असतो’, असं फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूटचे डॉ. जेम्स ली म्हणतात. इन्फ्लेमेशनसाठी कारणीभूत असणारी रसायनं जी मायक्रोफेजेसकडून स्रवत असतात त्याचं नियंत्रण हा जीन किंवा जनुक करतो. काही लोकांमध्ये जन्मत:च हे जनुक असतं, ज्यामुळे त्यांच्या शरीराची प्रवृत्ती हा आजार होण्याची असते. इन्फ्लेमेटरी बॉवेलसाठी कारणीभूत असलेल्या महत्त्वाच्या पेशींपैकी एका पेशीमध्ये दोष निर्माण होतो. ‘नेचर’ या मासिकात विस्तारानं दिलेल्या माहितीनुसार पुढील प्रयोगांमधून दिसून आलं आहे की, कॅन्सर सारख्या इतर आजारांसाठी आधीच मंजुरी मिळालेल्या काही औषधांमुळे या आजारावर नियंत्रण मिळवता येतं.