Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा जुनैद खान आगामी ‘महाराज’ हा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा पदार्पण करत आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत अभिनेते जयदीप अहलावत, शालिनी पांडे आणि शर्वरी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १४ जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. आता मात्र, जुनैदचा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
अभिनेता जुनैद खानचा आगामी ‘महाराज’ हा चित्रपट येत्या १४ जून रोजी चाहत्याच्या भेटीस येत आहे. यामुळे चाहत्यांची चित्रपटासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट पडद्यावर येण्यास आता पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान ‘महाराज’ हा चित्रपट वादात सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बजरंग दलाने जुनैद खानच्या ‘महाराज’ च्या निर्मात्यांवर हिंदूच्या धार्मिक भावना दुखाविल्याचा आरोप केला आहे. चित्रपटात दाखवलेल्या सीनमध्ये नेत्यांच्या नकारात्मक भूमिकेने देशातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. असेही म्हटलं आहे. तर बजरंग दलाने ‘महाराज’च्या निर्मात्यांना एक पत्र लिहून हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याचे स्क्रीनिंग करावे अशी मागणी केली आहे.
बजरंग दलाचे कोकण प्रदेश समन्वयक गौतम रावरिया यांनी जुनैद खानच्या ‘महाराज’ चित्रपटासंदर्भात त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी म्हटलं आहे की, “महाराज या चित्रपटात त्यांना काही आक्षेपार्ह असेल तर संघटना त्याच्यावर कारवाही करणार आहे. या चित्रपटाचे स्क्रीनिंग पुन्हा करावे, तोपर्यत हा चित्रपट कुठेही प्रदर्शित करू नये.”
सिद्धार्थ पी मित्रा दिग्दर्शित ‘महाराज’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट ‘महाराज लायबल केस’ वर आधारित असून, त्यात जयदीप अहलावत खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात जुनैद खानने पत्रकार करसनदास मुळजी यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता जयदीप अहलावतने शेफची भूमिका केली आहे. हा चित्रपट १४ जून २०२४ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. जुनैद हा या चित्रपटातून पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
हेही वाचा
दीपिका पादुकोणचा शानदार अंदाज; ‘कल्कि 2898 AD’चं पोस्टर रिलीज
अमृता राव ‘जॉली एलएलबी 3’ साठी सज्ज; अक्षय- अर्शद वारसी कोणासोबत होणार रोमाँटिक?
मी म्हातारी तरूण मुलाला डेट करतेय : मलायका अरोरा