बांगलादेशचा पहिला विजय; श्रीलंकेचा २ गडी राखून पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी २० विश्वचषक २०२४ (T20 World Cup 2024) चा १५ व्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेवर (SL vs BAN) २ गडी राखून मात केली. बांगलादेशचा या स्पर्धेतील हा पहिलाच विजय आहे. डलास येथे खेळलेल्या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्रीलंकेने २० षटकांत ९ गडी गमावून १२४ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने …

बांगलादेशचा पहिला विजय; श्रीलंकेचा २ गडी राखून पराभव

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : टी २० विश्वचषक २०२४ (T20 World Cup 2024) चा १५ व्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेवर (SL vs BAN) २ गडी राखून मात केली. बांगलादेशचा या स्पर्धेतील हा पहिलाच विजय आहे. डलास येथे खेळलेल्या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्रीलंकेने २० षटकांत ९ गडी गमावून १२४ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने १९ षटकांत ८ गडी गमावून १२५ धावा केल्या आणि सामना दोन विकेट्स राखून जिंकला.
‘ड’ गटातील रोमहर्षक लढतीत (SL vs BAN) विजय मिळवत बांगलादेशने सुपर-८ मधील दावेदारी मजबूत केली आहे. सध्या बांगलादेश गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. यासोबतच श्रीलंका सलग दुसऱ्या सामन्यात पराभवासह शेवटच्या स्थानावर पोहोचली आहे. याआधी त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.
या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेने पाथुम निसांकाच्या ४७ धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ९ गडी गमावून १२४ धावा केल्या. १२५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. एका धावेवर धनंजय डिसिल्वाने पहिला धक्का दिला. सौम्या सरकार खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला, तर तनजीद हसनला तुषारने बोल्ड केले. त्याला केवळ तीन धावा करता आल्या. यानंतर नजमुल हसन शांतोला तुषाराने बाद केले. बांगलादेशने २८ धावांवर चार विकेट गमावल्या होत्या. लिटन दास आणि तौहीद हृदय यांनी चौथ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. १२ व्या षटकात हसरंगाने तौहीदला एलबीडब्ल्यू आऊट केले. २० चेंडूत ४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळून तो पॅव्हेलियनमध्ये परतला तर लिटन दासने २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३६ धावा केल्या. या सामन्यात शकीब अल हसनने आठ धावा, रिशाद हुसेनने एक धाव आणि तस्किन अहमद शून्य धावा केल्या. महमुदुल्लाह (१६) आणि तंजीम (१) नाबाद राहिले.
श्रीलंकेकडून नुवान तुषाराने चार आणि वानिंदू हसरंगाने दोन विकेट्स घेतल्या. त्याचवेळी डिसिल्व्हा आणि पाथिराना यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा : 

T20 WC : पहिल्‍याच सामन्‍यात न्‍यूझीलंड ‘क्‍लीन बोल्‍ड’!अफगाणचा शानदार विजय
टी-२० विश्वचषक २०२४ : कॅनडाचेही धक्कातंत्र, आयर्लंडला हरवले