लोकसभा विरोधी पक्ष नेतेपदी राहुल गांधींची निवड होणार?
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा विरोधी पक्ष नेतेपदी राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे, असे वृत्त ‘Bharat Live News Media न्यूज’ने दिले आहे. दोन दिवसांमध्ये काँग्रेस संसदीय मंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
येत्या दोन दिवसांमध्ये काँग्रेस संसदीय मंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभा विरोधी पक्ष नेत्याला मंत्रीपदाचा दर्जा असतो. तसेच विरोधी पक्ष नेता हा भावी पंतप्रधान म्हणूनही ओळखला जातो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ९९ जागांवर विजय मिळवला आहे. यामध्ये राहुल गांधी यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळेच आता राहुल गांधी यांच्याकडेच लोकसभा विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी सोपविण्यात येईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.