नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मोठा बदल
नाशिक Bharat Live News Media ऑनलाइन – नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या मतदानाची वेळ याआधी सकाळी 8 ते दु.4.00 वाजेपर्यंत ठेवण्यात आली होती. परंतू ह्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
मतदानाची सुधारित वेळ सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंतची निश्चित करण्यात आली आहे, असे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी कळविले आहे.