Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : निर्भीडपणे आपली मते व्यक्त करणारा अभिनेता म्हणून किरण मानेंची ओळख आहे. वास्तव जगात घडणाऱ्या घडामोडींवर भाष्य करताना किरण मानेंचा स्पष्टवक्तेपणा सर्वश्रुत आहे. काल ४ जून रोजी लोकसभा २०२४ चे निकाल लागले. त्यानंतर आज अभिनेता किरण माने यांनी आपल्या अधिकृत फेसबूक पेजवर पोस्ट लिहिली असून त्यांनी उपहासात्मक टीका देखील केल्याचे पोस्टवरून वाटते. किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय?
किरण माने यांनी अखेरीस काय म्हटलंय?
‘आता देश आमचाच…’ आता खरा खेळ सुरु होईल, सर्वकाही लक्षात ठेवलं जाईल, असे म्हणत, किरण माने यांनी पोस्टचे शेवट केले आहे. त्यांनी म्हटलंय-”आता देश आमचाच. आता आम्हीच इथले अनभिषिक्त सम्राट असं समजून गेली दहा वर्ष सर्वसामान्य जनतेला, शेतकर्यांना, महिलांना, पाठीचा कणा ताठ ठेवणार्या दोनतीन कलाकारांना अर्वाच्य शब्दांत ट्रोल करणार्या पिलावळीला एकच सांगतो… अब शुरू होगा असली ‘खेला’. सब याद रख्खा जायेगा… सबकुछ याद रख्खा जायेगा.”
अधिक वाचा –
Janhvi Kapoor : जान्हवी बीएफ शिखरसोबत युरोपच्या रस्त्यावर हातात-हात घालून स्पॉट
किरण माने यांनी पुढे म्हटलंय-
एन.डी.ए. ही विचार, मैत्री वगैरे जुळणार्या पक्षांची नैसर्गिक ‘युती’ वगैरे नाही. सत्ताधार्या क्रूर दरोडेखोरांनी ईडी,सीबीआय,इनकमटॅक्स वगैरे यंत्रणांचा असंवैधानिक गैरवापर करून… धाक दाखवून… भिती दाखवून… बळजबरीने काॅलर पकडून खेचून आणलेल्या अनेक हतबल पक्षांची जमवलेली ‘टोळी’ आहे. हे स्वाभिमानावर गदा येऊन सो काॅल्ड ‘महाशक्ती’कडे गेलेले लोक, आता या जुल्मी माजोरड्यांच्या दहशतीचा वचपा काढायची अनमोल संधी सोडणार नाहीत, हे सांगायला कुठल्या कुडमुड्या ज्योतिषाची गरज नाही.
…डोक्याला पिस्तूल लावून धाक दाखवत पक्ष फोडून आणलेल्या खासदारांचे जुळवलेले ‘आकडे’ दाखवत, ‘एनडीए सत्तेत आली’ असं क्षीण स्वरात सांगताना काल हुकूमशहांच्या चेहर्यावरची हतबलता लपत नव्हती. कारण जनतेनं यावेळी त्यांना बरोब्बर ‘सिग्नल’ दिलेला आहे की ‘तुम्ही आम्हाला नको आहात.’
अधिक वाचा
‘तुझ्यावर अधिक प्रेम करायला लागलोय’; सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला पाठवली भेटवस्तू
हा निकाल संपूर्ण देशाला अपार आनंद देऊन गेला.
आनंद याचा आहे की “हा देश आमच्या बापाचा आहे.” हा रंगाबिल्लाचा माज ठेचला गेला.
आनंद याचा आहे की, “चारसो पार. आयेगा तो झिंगूर ही. चार जूनला बघतो तुला.” ही भक्तडुक्कर पिलावळीची चिखलफेक त्यांचंच तोंड काळं करून गेली.
आनंद याचा आहे की ऑरगॅजमिक स्वरात किंचाळुन आपल्या मालकाची सत्ता येणारच या माजात, ढोलताशे बडवत निकाल सांगणार्या पाळीव मिडीयाची थोबाडं ठेचली गेली.
आनंद याचा आहे की माझ्या भारत देशानं हुकूमशहांच्या सणसणीत मुस्काडात देऊन सांगीतलं की आम्हाला धर्मद्वेष नको. आम्हाला मंदिराचं पावित्र्य भंग करणारं राजकारण नको. आम्हाला संविधानाशी छेडछाड नको. आम्हाला बलात्कारी भ्रष्टाचारी लोकांनी खचाखच भरलेली व्यवस्था नको. आम्हाला ‘तुम्ही’ नको.
अधिक वाचा –
‘बंगळुरु रेव पार्टी’ प्रकरणात अभिनेत्री हेमा अटकेत, ड्रग टेस्टमध्ये फेल
खरंतर याहून दणदणीत निकाल लावून जनतेनं यांना लाथ घातलीय… पण काहीतरी फ्राॅड झालाय म्हणून हे आकडे कमी दिसतायत, हे नक्की. इव्हीएम घोटाळा तर नक्कीच झालाय. त्याची सखोल चौकशी आता होईलच. असो.
आता देश आमचाच. आता आम्हीच इथले अनभिषिक्त सम्राट असं समजून गेली दहा वर्ष सर्वसामान्य जनतेला, शेतकर्यांना, महिलांना, पाठीचा कणा ताठ ठेवणार्या दोनतीन कलाकारांना अर्वाच्य शब्दांत ट्रोल करणार्या पिलावळीला एकच सांगतो… अब शुरू होगा असली ‘खेला’. सब याद रख्खा जायेगा… सबकुछ याद रख्खा जायेगा.
जय शिवराय… जय भीम.
– किरण माने.