भीषण पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांचा थेट सरपंचाच्या घरावर मोर्चा
पिंपळनेर,जि.धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा – साक्री तालुक्यातील निजामपूर ग्रामपालिकेवर नागरीकांनी संतप्त मोर्चा काढला.
वार्ड क्रमांक 5 येथे भाीषण पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. त्यामुळे वॉर्ड मधील सर्व महिलांनी आक्रमक पवित्रा घेत ग्रामपालीकेत बुधवार (दि.५) रोजी सकाळी मोर्चा वळवला. पाणी समस्येने ग्रामस्थ संतप्त झाले असताना देखील सरपंच प्रतिनिधी भुषण वाणी यांनी तब्बल दोन तास नागरीकाना ग्रामपंचायतीमध्ये थांबून वाट बघायला लावली. यावेळी ग्रामसेवक राहुल मोरे यांनी देखील सरपंच प्रतिनीधी यांना संपर्क करून ग्रामपालिकेत येण्यास सांगितले असता ते वेळेवर आले नाही. संतपत नागरिकांनी थेट सरपंच यांच्या घरी मोर्चा वळवला. त्यानंतर भूषण वाणी यांना नागरीकांनी घेराव करून पाणी टंचाई बाबत जाब विचारला.
दिवसेंदिवस पाणी टंचाई समस्या वाढतच असून जाब विचारायला आलेल्या ग्रामस्थांना समाधानकारक उत्तरे न मिळता “तुमच्या कडून जसे होईल तसे करा, माझ्यावर केस करा, कुठेही तक्रार करा, परंतु मला पटेल तस मी नियोजन करेल, मला कोणीही काही विचारू नये ” अशा प्रकारची संतापजनक उडवाउडवीची उत्तरे मिळाली. संतप्त ग्रामस्थांमुळे सरपंच यांच्या घराजवळच गोंधळा झाला होता, नागरीकांनी घेराव करून पाणीटंचाई बाबत जाब विचारला. पाणी टँकरने देखील पुरेसा पाणी पुरवठा होत नाही.
ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, सुरेश मोरे, प्रकाश बच्छाव, सदस्य रमेश कांबळे यांनी देखील मध्यस्थी करून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थ पाणी समस्याला वैतागले असल्याने त्यांनी आक्रमकतेचे पाऊल उचलले. ग्रामसेवक राहुल मोरे यांनी लेखी आश्वासन दिले असून लवकरच नवीन बोरवेलद्वारे मोटर टाकून पाणीपुरवठा सुरळीत करु असे पत्राद्वारे सांगितले आहे.
हेही वाचा:
पराभवानंतर बारामतीत राष्ट्रवादी भवनात शुकशुकाट
कुरुंगवडीमध्ये घराला आग, चौघे जखमी; 25 ते 30 लाखांचे नुकसान