Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सुकेश चंद्रशेखर तुरुंगातूनच जॅकलिन पत्र लिहित होता तर कधी प्रेमाने ‘बेबी’, ‘बॉम्मा’ आणि ‘कपकेक’ असे संबोधित केले आहे. नुकताच कान्स २०२४ च्या महोत्सवात जॅकलिनने शानदार उपस्थिती लावली. आता सुकेशने आपले प्रेम व्यक्त केले आहे. जॅकलीनने सुकेशशी आपला काही संबंध असल्याचे म्हटले होते. तिच्य़ा नकारानंतर फेब्रुवरी २०२४ मध्ये मीडियाच्या माध्यमातून तिची प्रतिमा मलीन करण्याचा आरोप तिने केला होता. सध्या सुकेश २०० कोटी रुपयांची ठग प्रकरणात दिल्लीतील मंडोली तुरुंगात आहे.
अधिक वाचा –
‘बंगळुरु रेव पार्टी’ प्रकरणात अभिनेत्री हेमा अटकेत, ड्रग टेस्टमध्ये फेल
तुझ्यावर अधिक प्रेम करत आहे – सुकेश
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुकेशने जॅकलीनच्या प्रति पुन्हा एकदा आपले प्रेम व्यक्त केले आहे. त्याने अभिनेत्री जॅकलिनच्या नावाचा एक ‘स्टार’ देखील गिफ्ट केलं आहे. सुकेश म्हणाला, “मला तुझी खूप आठवण येते. मी तुझ्यावर अधिक प्रेम करत आहे. बेबी, तू कान्समध्ये सर्वांची मने जिंकली आहेस. तू नेहमीप्रमाणे सुंदर दिसत आहेस. तू पुन्हा माझं मन जिंकलं आहेस.”
अधिक वाचा –
हार्दिक पांड्या-नताशाचे भांडण संपुष्टात? सोशल मीडियावर कपल फोटो पुन्हा दिसले
सुकेशने अनेकवेळा प्रेम व्यक्त केलं…
सुकेशने लिहिलं, “मी तुला तुझ्या नावाने एक ‘स्टार’ गिफ्ट करत आहे. आता तू त्या काही खास लोकांच्या यादीत आहेस, ज्यांच्याकडे असली स्टार आहे. तू याची हकदार आहे. हा स्टार नेहमीसाठी अमर राहिल, जसे की आमचे एकमेकांसाठी प्रेम.”
अधिक वाचा –
‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकणारा पहिला मराठी चित्रपट
याआधी सुकेशने जॅकलीनच्या वाढदिवसाला पत्र लिहून खूप प्रेम व्यक्त केलं होतं. ख्रिसमस आणि व्हॅलेंटाईन डेलादेखील जॅकलीनच्या प्रति आपले प्रेम व्यक्त केले आहे.
View this post on Instagram
A post shared by Jacqueliene Fernandez (@jacquelienefernandez)