वाशिम : आठ वर्षीय मुलगीवर नराधमाचा अत्याचार; गुन्हा दाखल
वाशिम : Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील भागात एका आठ वर्षीय मुलगीवर एका नराधमाने लैगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. याप्रकरणी उपस्थितांनी आरोपीला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. मुलगीला रुग्णालयात भरती करण्यात आले असून शहर पोलिसांनी पिडीत मुलीच्या वडिलाच्या तक्रारीवरुन आरोपीवर पोस्को तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. विजय उर्फ भोलाराम बरखम (वय २७) असे या आरोपीचे नाव आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, परिसरातील एका घरामध्ये दिनांक १ जुन रोजी सायंकाळी ६ वाजता ८ वर्षीय मुलगी, तीची ७ वर्षीय बहीण व आई-वडील हे हळदीचा कार्यक्रमात सहभागी झाले होते. दरम्यान कार्यक्रमादरम्यान एक तासानंतर मुलगी कार्यक्रमात दिसली नाही असे लक्षात आले. यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी मुलीचा शोध सुरु केला. मात्र, मुलगी दिसून आली नसल्याने वडिलांनी ११२ वर कॉल करुन पोलीसांना बोलावून घेतले. पोलिसांसह सर्वांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
याचदरम्यान विजय उर्फ भोलाराम बरखम हा वाईट प्रवृत्तीचा इसम असल्याने त्याचा संशय आला. यानंतर मुलगीचे वडील इतर लोक विजयच्या घराकडे गेले. त्याच्या घराजवळ येताच मुलीचा रडण्याचा आवाज आला असता सर्वजण दरवाजा तोडून घरात गेले. तर आरोपी विजय हा मुलगीवर लैगिंक अत्याचार करताना दिसून आला. यावर संतप्त जमावाने त्याला चोप देण्यास सुरुवात केली. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत आरोपीला ताब्यात घेतले. व पिडीत मुलगीला उपचारासाठी त्वरीत उपचारासाठी रुग्णालयात पाठविले.
याप्रकरणी शहर पोलीसांनी २ जून रोजी आरोपी विजय उर्फ भोलाराम बरखम याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० अन्वये कलम ३७५ एबी, ३०७, ३६३ व बालकांचे लैंगिक अपराधापासुून संरक्षण ४ आणि ६ नुसार गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली. याप्रकरणी शहर पोलीस निरिक्षक देवेंद्रसिंह ठाकुूर यांच्या मार्गदर्शनात उपनिरिक्षक श्रीदेवी पाटील या पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा
डॉ. अमोल कोल्हेंना हडपसरमधून 17 हजार 958 मताधिक्य!
सुनेत्रा पवार यांच्या पराभवास राष्ट्रवादीचे पदाधिकारी जबाबदार
नव्या टॅक्स व्यवस्थेत पीपीएफच्या व्याजाचे काय?