राजधानी सातार्‍यातून उदयनराजे विजयी

सातारा : पुढारी वृत्तसेवा संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार व छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दणदणीत विजय मिळवून पुन्हा एकदा दिल्लीचे तख्त काबीज केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आ. शशिकांत शिंदे यांचा त्यांनी सुमारे 30 हजार मतांनी पराभव केला. प्रारंभी पोस्टल मतदान …

राजधानी सातार्‍यातून उदयनराजे विजयी

सातारा : Bharat Live News Media वृत्तसेवा संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार व छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दणदणीत विजय मिळवून पुन्हा एकदा दिल्लीचे तख्त काबीज केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आ. शशिकांत शिंदे यांचा त्यांनी सुमारे 30 हजार मतांनी पराभव केला.
प्रारंभी पोस्टल मतदान मोजणीसाठी घेण्यात आले. मात्र, हा कौल उदयनराजेंच्या विरोधात गेला होता. त्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर आ. शशिकांत शिंदे यांनी मताधिक्य घ्यायला सुरूवात केली. काही फेर्‍यांमध्ये त्यांनी आघाडी घेतली होती. मात्र, दुपारनंतर खा. उदयनराजेंनी मताधिक्य घेत विजयाच्या दिशेने वाटचाल केली. ही आघाडी अखेरच्या फेरीपर्यंत कायम राहिली. त्यांच्या विजयाचा वारु अखेरपर्यंत आ. शशिकांत शिंदे यांना रोखता आला नाही. उदयनराजे विजयी होताच राजधानी सातार्‍यात जल्लोषाला सुरूवात झाली. राजेंच्या मावळ्यांनी फटाके फोडले, गुलाल उधळला. राजधानीत राजेंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार रॅली काढत विजय साजरा केला.
हेही वाचा : 

Chandrapur Lok Sabha election: काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांची सव्वा लाखाच्या आघाडीने विजयाकडे वाटचाल

पुण्यात मुरलीधर मोहोळांची विजयी वाटचाल; कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला उधाण

‘बच्चा बडा हो गया!’ सुप्रिया सुळेंच्या निर्णायक विजयावर रोहित पवारांचे ट्विट