अमरावतीत बळवंत वानखडे आघाडीवर, नवनीत राणांची पराभवाकडे वाटचाल?

अमरावतीत बळवंत वानखडे आघाडीवर, नवनीत राणांची पराभवाकडे वाटचाल?

अमरावती, Bharat Live News Media वृत्तसेवा अमरावती लोकसभेची मतमोजणी निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. आतापर्यंत मतमोजणीच्या दहा फेऱ्या झाल्या आहेत. यामध्ये काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली आहे. सुरुवातीपासूनच भाजप उमेदवार नवनीत राणा यांना मतमोजणीत आघाडी टिकवता आली नाही. दहाव्या फेरी अखेर बळवंत वानखडे यांना 3 लाख 85 हजार 788 मते मिळाली आहेत.
प्रतिस्पर्धी उमेदवारावर त्यांनी 15 हजार 918 मतांनी आघाडी घेतली आहे. तर नवनीत राणा यांना आतापर्यंतच्या मतमोजणीत 3 लाख 69 हजार 870 मते मिळालेली आहेत. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांना 57 हजार 69 मते मिळाली आहेत. तर वंचित समर्थित रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांना 10 हजार 792 मते दहाव्या फेरी अखेर मिळालेली आहेत.
आणखी आठ फेऱ्या मतमोजणीच्या होणार आहेत. त्यामुळे ही मतमोजणी निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. मात्र महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांनी घेतलेली मतमोजणीतील आघाडी पाहता नवनीत राणा यांची पराभवाकडे वाटचाल सुरू असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे अमरावतीतील काँग्रेस भवनात कार्यकर्ते उमेदवाराच्या विजयाची घोषणा होण्यापूर्वीच जल्लोष करत आहेत. मात्र अंतिम निकाल आल्यावरच चित्र स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा : 

Lok Sabha Election Result : पश्‍चिम बंगालमध्‍ये तृणमूलचे वर्चस्‍व, भाजपला धक्‍का

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी; मतदारांनी दिला काँग्रेसला कौल

Sangali Lok Sabha Election: सांगलीत वसंतदादांची पुण्याई कायम – अपक्ष लढत नातू विशालने जिंकली लोकसभा